सीमापार करत किम जोंग यांनी घेतली मून यांची भेट

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

किम जोंग यांनी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून यांना आपण सेऊलला कधीही येण्यासाठी तयार आहोत, असे सांगत तुम्ही आमंत्रण दिले की, मी येईन असा प्रतिसाद दिला होता. तसेच मून यांनी किम यांचे स्वागत करताना आपण ब्लू हाऊसमध्ये (सेऊलमधील इमारत) आला तर यापेक्षा चांगला पाहुणचार करू असे सांगितले होते.

सेऊल : उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून या दोन्ही नेत्यांमध्ये दक्षिण कोरियाच्या सीमेत लष्करमुक्त प्रदेशात आज चर्चा झाली. अत्यंत कडक बंदोबस्तात ही भेट झाली. जागतिक शांततेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या या परिषदेत आशियासह सर्व जगाच्या शांततेसाठी आवश्यक पावले उचण्याबाबत आणि इतर काही मुद्यांवर चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

Korea summit Kim Jong un

किम जोंग यांनी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून यांना आपण सेऊलला कधीही येण्यासाठी तयार आहोत, असे सांगत तुम्ही आमंत्रण दिले की, मी येईन असा प्रतिसाद दिला होता. तसेच मून यांनी किम यांचे स्वागत करताना आपण ब्लू हाऊसमध्ये (सेऊलमधील इमारत) आला तर यापेक्षा चांगला पाहुणचार करू असे सांगितले होते. त्यानुसार सीमापार करत किम जोंग यांनी मून जाई इन्स यांची भेट घेतली. मागील वर्षी उत्तर कोरियाने अनेक अण्वस्त्रांची चाचणी घेतली होती. त्यामुळे पूर्व आशियात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्याचप्रमाणे उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यातीस संबंध अधिकच तणावपूर्ण बनले होते.

दरम्यान, किम जोंग यांच्या स्वागतासाठी दक्षिण कोरियन भागात रेड कार्पेट टाकण्यात आले. त्यावेळी किम जोंग यांना शालेय विद्यार्थ्यांनी फुले देऊन आणि पारंपारिक कोरियन नृत्य करत त्यांचे स्वागत करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Korea summit Kim Jong un makes history crosses border to meet South Moon Jae