कुलभूषण जाधवांना सोडा असे सांगितलेले नाही : इम्रान खान

Imran Khan
Imran Khan

इस्लामाबाद : कुलभूषण जाधव प्रकरणी कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केल्यानंतर आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना सोडा किंवा भारताच्या स्वाधीन करा असे म्हटले नसल्याचे ट्विट केले आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे स्वागत करताना इम्रान खान म्हणाले, की आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना सोडण्याची किंवा पुन्हा भारताच्या ताब्यात देण्याचे सांगितलेले नाही. पाकिस्तानी नागरिकांविरोधात केलेल्या गुन्ह्यांबद्दल ते दोषी आहेत. पाकिस्तानमधील कायद्यानुसार त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल. 

तर दुसरीकडे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे, की पाकिस्तान हा आंतरराष्ट्रीय समुदायाचा जबाबदार सदस्य आहे आणि आपली जबाबदारी आम्ही पहिल्यापासून पार पाडत आहोत. त्यामुळेच या खटल्याच्या सुनावणीलाही आम्ही उपस्थित होतो. कायद्यानुसार या प्रकरणी कारवाई करण्यात येईल.

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून (आयसीजे) दिलासा मिळाला होता. न्यायालयाने त्यांच्या फाशीला स्थगिती दिली. तसेच पाकिस्तानने कुलभूषण यांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेचा फेरविचार करावा, असा आदेश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिला. भारताचा हा मोठा विजय मानला जातो.  पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना हेरगिरी व दहशतवादीच्या आरोपाखाली एप्रिल 2017 मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर भारतामध्ये त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. त्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारताच्या याचिकेवर निकाल दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com