कामगारटंचाईच्या उंबरठ्यावर हंगेरी

रॉयटर्स
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

कंपन्यांकडून परदेशी कामगारांची भरती; सॅमसंगमध्ये युक्रेनमधील कामगार
बुडापेस्ट - हंगेरीतील उत्पादन प्रकल्पांमध्ये मनुष्यबळाची कमतरता जाणवू लागल्याने सॅमसंगने युक्रेनमधील कामगारांची भरती सुरू केली आहे. हंगेरी, पोलंड आणि चेक प्रजासत्ताक या पूर्व युरोपमधील देशांमधून अनेक वर्षांपासून पश्‍चिम युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतर सुरू आहे. यामुळे या देशांत कामगारांची कमतरता जाणवू लागली आहे.

पंतप्रधान व्हिक्‍टर ऑर्बन यांच्या सरकारने हंगेरीतील कंपन्यांमध्ये युरोपीय समुदायातील मुस्लिम स्थलांतरितांना कोटा देण्यास विरोध दर्शविला आहे. मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी काही कंपन्यांनी परदेशातील कामगारांची भरती करण्यास सुरवात केली आहे. युरोपमधील सॅमसंगच्या सर्वाधिक मोठ्या उत्पादन प्रकल्पात युक्रेनमधील 120 ते 150 कामगारांची भरती करण्यात आली आहे. यासोबत ऑगस्टपासून कंपनीने 2 हजार 600 स्थानिक कामगारांची भरती केली आहे.

देशातील कामगारांची संख्या वाढावी यासाठी सांस्कृतिक व ऐतिहासिक पार्श्‍वभूमी समान असलेल्या परदेशी कामगारांना परवानगी देण्यात येईल, असे अर्थमंत्री मिहाली वर्गा यांनी म्हटले होते. जर्मनीतील आघाडीच्या ऑडी आणि डेमलर या कंपन्यांनाही हंगेरीतील कामगारटंचाईचा फटका बसत आहे.

वार्षिक वेतनात वाढ
परकी कंपन्या हंगेरीत गुंतवणूक करताना स्थानिक तरुण रोजगारासाठी मुबलक प्रमाणात मिळतील, अशा ठिकाणांना पसंती देत आहेत. हंगेरीतील बेरोजगारीचा दर जून ते ऑगस्ट या काळात 4.9 टक्‍क्‍यांवर आला आहे. याचबरोबर सरकारी आकडेवारीनुसार वार्षिक वेतन ऑगस्टमध्ये 6.9 टक्‍क्‍यांनी वाढले आहे.

Web Title: labour shortage in hungeri