हाफिज सईदला त्रास देऊ नका ; लाहोर उच्च न्यायालय

वृत्तसंस्था
Thursday, 5 April 2018

लोहार उच्च न्यायालयाने हाफिज सईदची नोव्हेंबर महिन्यात तुरुंगातून मुक्तता केली होती. त्यानंतर हाफिज सईदने 'मिली मुस्लिम लीग' (एमएमएल) या राजकीय पक्षाची स्थापना केली.

नवी दिल्ली : 26/11 रोजी झालेल्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील मुख्य सूत्रधार हाफिज सईदने पाकिस्तानच्या राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर लाहोर उच्च न्यायालयाने पाकिस्तान सरकारला ''हाफिज सईदला त्रास देऊ नका, त्यांना त्यांचे सामाजिक कार्य करू द्या'', असे सांगितले. 

लोहार उच्च न्यायालयाने हाफिज सईदची नोव्हेंबर महिन्यात तुरुंगातून मुक्तता केली होती. त्यानंतर हाफिज सईदने 'मिली मुस्लिम लीग' (एमएमएल) या राजकीय पक्षाची स्थापना केली. पाकिस्तानातील आगामी सार्वत्रिक निवडणुकांमध्ये हाफिज सईदकडून उमेदवार उभे केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अमेरिकेने 'एमएमएल'ला विदेशी दहशतवादी संघटनेचा दर्जा देत पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीतील सात सदस्यांनाही विदेशी दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. तसेच 'लष्करे तोयबा'शी संबंधित असलेल्या 'तेहरिके अझादी ए काश्‍मीर' या संघटनेलाही दहशतवादी संघटना म्हणून अमेरिकेने घोषित केले आहे.

त्यानंतर आता हाफिज सईदला त्रास देऊ नका, त्यांना त्यांचे सामाजिक कार्य करू द्या, असे लाहोर उच्च न्यायालयाने सांगितले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lahore high court to Pakistan govt says Dont harass Hafiz Saeed