तीन दिवसांचा 'लाहोर लिटररी फेस्टिव्हल' आता फक्त एक दिवस

वृत्तसंस्था
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

कराची (पाकिस्तान) - पाकिस्तानमध्ये "लाहोर लिटररी फेस्टिव्हल' या नावाने आयोजित केला जाणारे साहित्य संमेलन यंदा सुरक्षेच्या कारणास्तव तीन दिवसांऐवजी एकच दिवस आयोजित करण्यात आले आहे.

कराची (पाकिस्तान) - पाकिस्तानमध्ये "लाहोर लिटररी फेस्टिव्हल' या नावाने आयोजित केला जाणारे साहित्य संमेलन यंदा सुरक्षेच्या कारणास्तव तीन दिवसांऐवजी एकच दिवस आयोजित करण्यात आले आहे.

याबाबत एका स्थानिक इंग्रजी वृत्तपत्राने वृत्त दिले आहे. या महोत्सवाचे यंदा पाचवे वर्ष होते. हा महोत्सव यावर्षी तीन दिवस आयोजित करण्यात येणार होता. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव तीन दिवसांचे कार्यक्रम एकाच दिवसात आटोपण्यात येणार आहेत. सुधारित कार्यक्रमही प्रभावीपणे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती महोत्सवाचे संस्थापक रझी अहमद यांनी दिली. यंदाच्या महोत्सवात एकाच वेळी नऊ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

लाहोर लिटररी महोत्सवात दरवर्षी पंजाबी, पाकिस्तान आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यक्तींना निमंत्रित करण्यात येते. लाहोरमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या या महोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तरावरही ओळख प्राप्त झाली आहे.

Web Title: Lahore Literary Festival cut down to single day due to security issues