जगातील सर्वात मोठी जनगणना

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 November 2020

चीनमध्ये १ नोव्हेंबरपासून सुरू झालेली जनगणना सातवी फेरी असून, त्यातून वयोगटनिहाय लोकसंख्येचे स्वरूप अधिक स्पष्ट होणार आहे. 

चीनमध्ये १ नोव्हेंबरपासून सुरू झालेली जनगणना सातवी फेरी असून, त्यातून वयोगटनिहाय लोकसंख्येचे स्वरूप अधिक स्पष्ट होणार आहे. 

आतापर्यंतच्या जनगणनांची वर्षे 
१९५३, १९६४, १९८२, १९९०, २००० आणि २०१०. 

२०१० ची जनगणना 
एकूण लोकसंख्या १३३,९७,२४,८५२. 
लोकसंख्या वाढ - ५.८३ टक्के 
(म्हणजेच सुमारे ७,३८,९९,८०४). 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोणती घेणार माहिती 
वय, शिक्षण, व्यवसाय, वैवाहिक स्थिती, स्थलांतरित जनतेचे स्वरूप. लोकसंख्येतील सूक्ष्मातील सूक्ष्म बदलांची नोंद घेतली जाणार. 

कोणाची होणार गणना 
चीनची मुख्य भूमी, परदेशात अल्पकाळासाठी व्हिसा घेऊन गेलेले चिनी, हॉंगकॉंग, मकाऊ भागातील रहिवासी. चीनी भूमीवर सहापेक्षा अधिक महिने राहणारे परदेशी नागरिक. 

असे असेल सर्वेक्षण 
कामाचा कालावधी - २ महिने. 
सहभागी कर्मचारी - वीस लाख. 
एकूण सुमारे ७० लाख कम्युनिटी वर्कर आणि कर्मचारी. 

एका अधिकाऱ्याच्या हाताखाली २५० जण. 
घरोघरी जाऊन, तसेच स्मार्टफोनवर अपलोड केलेल्या माहितीद्वारे सर्वेक्षण. 

कुठून, कुठपर्यंत
शांघायमधील गगनचुंबी इमारतींपासून ते तिबेटच्या पर्वतराजीतील खेड्यांपर्यंत. 

कोण करतंय सर्वेक्षण
नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्‍स आणि स्थानिक सरकारे संयुक्तपणे. 

ज्येष्ठांची संख्या वाढतेय 
चीनी ज्येष्ठांची संख्या वाढतेय, परिणामी उत्पादकताक्षम लोकसंख्या घटत आहे. 

अहवाल कधी 
जनगणना प्रक्रियेनंतर दोन वर्षांत आकडेवारी जाहीर होणार. 

मायक्रो पॉप्युलेशन सर्वे 
चीनच्या १ टक्का लोकसंख्येसाठी हा सर्वे करणार. २०२०-३० कालावधीत लोकसंख्येतील बदलांची नोंद यात घेणार. चीन आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्ट्ये समोर ठेवून २०२१-२५ या कालावधीसाठी चौदावी पंचवार्षिक योजना बनवतंय. त्याच्या धोरणनिश्‍चितीवर या जनगणनेचा प्रभाव असेल. पायाभूत सुविधांचा विस्तार, कल्याणकारी योजनांची दिशा या आकडेवारीवरून ठरते. लोकसंख्येच्या वयोमानानुसार शाळा आणि रिटार्यमेंट होम यांची संख्या निश्‍चित होते. 

एक मूल, एक दांपत्य 
चीनने हे धोरण सत्तरच्या दशकात स्वीकारले होते, त्यात चार वर्षांपूर्वी शिथिलता दिली गेली. तथापि, त्याने ‘बेबीबूम' आली, असे चित्र नाही. गतवर्षी चीनमध्ये राष्ट्रीय जन्मदर कम्युनिस्ट चीनच्या स्थापनेवेळेपेक्षा (१९४९) कमी झाल्याची नोंद गेल्या वर्षी झाली. नव्या धोरणाचा  परिणाम दिसायला १५ वर्षे लागतील, असा अंदाज आहे. चीनने मुलाबाबतच्या धोरणात बदल केल्यानंतर हजार महिलेमागे जन्मदर २०१५ मध्ये ४५.६ होता, तो २०१६ मध्ये एकदम वाढून ४९.९ वर पोहोचला, त्यात एकदम घट येऊन २०१८ मध्ये ४३.९ झाला.

७७० कोटी - जगाची सध्याची जगाची लोकसंख्या
९७० कोटी - २०५० मधील अपेक्षित लोकसंख्या
११०० कोटी - २१०० मधील अपेक्षित लोकसंख्या

प्रजननक्षम वयाची लोकसंख्या, प्रजननाचा वेग, वाढते शहरीकरण आणि स्थलांतराचा वेग यांचा यात विचार केलेला आहे. भारताची १३९ तर चीनची १४४ कोटी लोकसंख्या गृहीत धरलेली आहे. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: largest census in the world