PM मोदी, अदानींविरोधात खटला दाखल, कोर्टाने जारी केलं समन्स; वाचा नेमक काय झालं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Modi Adani

PM मोदी, अदानींविरोधात खटला दाखल, कोर्टाने जारी केलं समन्स; वाचा नेमक काय झालं

Lawsuit Against PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी आणि ज्येष्ठ उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरोधात अमेरिकेत खटला दाखल करण्यात आला आहे. भ्रष्टाचार, पेगासस स्पायवेअरचा वापर आणि इतर मुद्द्यांवर हा खटला दाखल करण्यात आला असून, अमेरिकेतील कोलंबियाच्या जिल्हा न्यायालयाने या सर्वांविरुद्ध समन्स जारी केले आहे. या प्रकरणात 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'चे अध्यक्ष आणि संस्थापक प्रोफेसर क्लॉस श्वाब यांच्या नावाचाही समावेश आहे.

हेही वाचा: मनावर नियंत्रण मिळवणारी बाप्पाची ७ शस्त्रे

भारतीय वंशाच्या अमेरिकन डॉक्टर लोकेश वुरुरू यांनी हा खटला दाखल केला आहे. मूळचे आंध्र प्रदेशातील या डॉक्टरने पंतप्रधान मोदी, रेड्डी, अदानी आणि इतर भ्रष्टाचारात गुंतल्याचा आरोप केला आहे, ज्यात अमेरिकेत मोठ्या प्रमाणात रोख हस्तांतरण आणि राजकीय विरोधकांविरुद्ध पेगासस वापरण्याचा समावेश आहे. मात्र, संबंधित डॉक्टरने याबाबत कोणताही पुरावे सादर केलेले नाही.

हेही वाचा: धडे बाप्पाचे, २१ मार्ग यशाचे : काय आहे गणेशाच्या उपासनेचा पासवर्ड

वुरुरू यांनी 24 मे रोजी खटला दाखल केला होता, त्यानंतर न्यायालयाने 22 जुलै रोजी समन्स जारी केले असून, ते 4 ऑगस्ट रोजी प्राप्त झाले आहे. दरम्यान, न्यूयॉर्कमधील भारतीय-अमेरिकन वकील रवी बत्रा यांनी हा खटला पूर्णपणे निरर्थक असल्याचे म्हणत यातून काहीही मिळणार नसल्याचे मत व्यक्त केले आहे.

Web Title: Lawsuit Against Pm Modi Jagan Mohan Reddy And Gautam Adani In Us Columbia

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..