धक्कादायक! चीनने कोरोनाच्या प्रसाराची दिली होती चुकीची माहिती, कागदपत्रे लीक

china
china

नवी दिल्ली: 2020 च्या डिसेंबर महिन्यात कोरोनाचा पहिल रुग्ण चीनमध्ये आढळला होता. हा पहिला रुग्ण चीनच्या वूहानमध्ये आढळून आला होता. त्यांनंतर जगभरात कोरोना व्हायरसचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत गेला. जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी कोरोनाव्हायरस रिसोर्स सेंटरच्या मते, जगभरात आतापर्यंत 6.3 कोटी लोकांना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील 14 लाखांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे.

अनेक अहवालांवरून हे सिद्ध झाले आहे की चीनने कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाशी संबंधित पुरावे जाणूनबुजून दाबून ठेवले तसेच काही नष्ट केले. चीनने जगातील इतर देशांना कोरोनाची माहिती दिली नव्हती. चीनमधील ज्या डॉक्टरांनी यावर बोलण्याचा प्रयत्न केला त्यांना चीनने शांत बसवले . तसेच चीनने प्रयोगशाळेतील बरेच पुरावे नष्ट केले आणि लसीवर काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांना जिवंत नमुने देण्यासही नकार दिला होता.

सीएनएनमध्ये (CNN) प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, "अंतर्गत दस्तऐवज, कृपया गोपनीय ठेवा" अशी माहिती असलेले दस्तऐवज हुबेई प्रांतातील स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी झाकून ठेवला होता. तसेच रुग्णांची यादीही चुकीची दाखवल्याची माहिती समोर आली आहे. 

चिनी आरोग्य व्यवस्थेत काम करणाऱ्या एका व्यक्तीने हुबेई प्रांतीय सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन(CDC)मधून 117 पानांची अंतर्गत कागदपत्रे सीएनएनला पुरवली आहेत. सीएनएनच्या सहा तज्ज्ञांनी पडताळणी केलेल्या फायलींवरून हे दिसून आले की, ऑक्टोबर 2019 ते एप्रिल 2020 या कालावधीत कोरोनाव्हायरसचे व्यवस्थापन करण्यासाठी चीन कसा संघर्ष करत होता. 

WHO शोधणार कोरोना व्हायरसचं मुळ-
कोरोनाची सुरुवात झालेला चीन आता बऱ्यापैकी यातून सावरला आहे. मागील काही दिवसांत चीनच्या उत्तरेकडील प्रांतात कोरोनाचे रुग्ण आढळले होते. पण सध्या चीनमधील सगळे व्यवहार सुरु आहेत.  जागतिक आरोग्य संघटना कोरोनाचा प्रसार कसा झाला याचा शोध लावणार आहे. त्यामुळे पुढे एखादी महामारी आली तर त्याचा सामना करण्यासाठी फायदा होईल, अशी माहिती WHOचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी दिली आहे.

(edited by- pramod sarawale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com