पाकमध्ये रेल्वे अपघातात 19 मृत्युमुखी 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

कराची - स्थानकावर थांबलेल्या रेल्वेगाडीला वेगाने येणाऱ्या दुसऱ्या रेल्वेगाडीची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात 19 जण मृत्युमुखी पडले, तर 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. कराचीमधील गडाफी गावामध्ये हा अपघात झाला. स्थानकात थांबलेल्या फरीद एक्‍स्प्रेसला झकेरिया एक्‍स्प्रेसची जोरदार धडक बसली. या धडकेमध्ये दोन्ही रेल्वेगाड्यांच्या मिळून तीन डब्यांचे मोठे नुकसान झाले. या डब्यांमध्ये बसलेल्या 19 प्रवाशांचा यामुळे मृत्यू झाला, तर डब्यातील आणि आजूबाजूला असलेले 50 हून अधिक जण जखमी झाले. झकेरिया एक्‍स्प्रेसच्या चालकाने सिग्नलकडे दुर्लक्ष केल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासानंतर लक्षात आले आहे.

Web Title: At least 16 killed, 40 injured as trains collide in Pakistan