इराकमध्ये आत्मघातकी बाँबहल्ल्यात 32 ठार; 61 जखमी

वृत्तसंस्था
सोमवार, 2 जानेवारी 2017

बगदाद- इराकमधील सदर शहरातील वर्दळ असलेल्या मध्यवर्ती भागात झालेल्या एका आत्मघातकी कार बाँबस्फोटात किमान 32 लोक मृत्युमुखी पडले, तर 60 पेक्षा अधिक लोक जखमी झाले. 

मृत्युमुखी पडलेल्यापैंकी अनेकजण रोजंदारीवर काम करणारे मजूर होते. ते कामाच्या प्रतीक्षेत सदर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी थांबले असताना आत्मघातकी कार बाँबचा स्फोट घडवून आणण्यात आला. इराकची राजधानी बगदादपासून जवळ असलेले सदर हे शहर विकसित होत असून, येथे शियापंथीयांची लोकसंख्या अधिक आहे. बगदादच्या ईशान्येला असलेले सदर सातत्याने दहशतवाद्यांचे लक्ष्य बनत आहे. 

स्फोट झाल्यानंतर काही वेळात सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या छायाचित्रांमध्ये घटनास्थळी आकाशात उसळलेले काळ्या धुराचा लोट दिसत आहेत, तसेच, जखमी लोकांची सुटका करण्यात येत असल्याचे दिसते.
एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटात किमान 32 लोक मारले गेले, तर 61 लोक जखमी झाले आहेत. 

Web Title: at least 32 killed in iraq car bomb blast