ब्राझीलमध्ये कारागृहात पुन्हा हाणामारी; 33 ठार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

रिओ दी जानेरो: ब्राझीलमधील ऍमेझॉन भागात असलेल्या कारागृहात कैद्यांमध्ये झालेल्या हाणामारीत 33 कैद्यांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती अधिकाऱयांनी आज (शुक्रवार) दिली.

ऍमेझोनास राज्यातील मनाऊस येथे पाच दिवसांपूर्वीही अशाच प्रकारची घटना घडली होती. एका तुरुंगात टोळीयुद्ध भडकून झालेल्या हाणामारीत साठ कैद्यांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, ब्राझीलमधील अनेक तुरुंग कैद्यांनी खचाखच भरले असल्याने अनेकदा टोळीयुद्ध होत असते. ब्राझीलमध्ये 2014 अखेर तुरुंगातील कैद्यांची संख्या सहा लाख बावीस हजार आहे. याबाबतील अमेरिका, चीन आणि रशियानंतर ब्राझील चौथ्या क्रमांकावर आहे.

Web Title: At least 33 prisoners killed in Brazil prison uprising