बालविवाह संमती विधेयक तुर्कस्तानमध्ये मागे

यूएनआय
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

अंकारा (तुर्कस्तान) - तुर्कस्तानमधील बालविवाहाला मान्यता देणारे विधेयक नागरिकांच्या विरोधामुळे अखेर मागे घेण्यात आले.

अंकारा (तुर्कस्तान) - तुर्कस्तानमधील बालविवाहाला मान्यता देणारे विधेयक नागरिकांच्या विरोधामुळे अखेर मागे घेण्यात आले.

या विधेयकावर मंगळवारी शिक्कामोर्तब होणार होते; पण विरोधी पक्ष, नागरिक, उजव्या संघटना यांनी त्याला कडाडून विरोध केला होता. त्यामुळे ते मागे घेण्याची घोषणा सोमवारी (ता.21) रात्री करण्यात आली. हे विधेयक पुनरावलोकनासाठी संसदीय समितीसमोर ठेवण्यात येईल, असे सरकारतर्फे जाहीर करण्यात आले. तुर्कस्तानमध्ये विवाहाचे वय 18 वर्षे आहे. मात्र, 16 वर्षांच्या मुलामुलींच्या कायदेशीररित्या विवाहालाही न्यायालयात मान्यता दिली जाते. इस्लामी पद्धतीने अनेक अल्पवयीन मुलामुलींचे विवाह देशात झालेले आहेत.

लैंगिक अत्याचार प्रकरणात जर जबरदस्ती केलेली नसेल आणि यात बळी पडलेली व्यक्ती व तसे कृत्य करणारा जर विवाहित असेल तर त्यांना शिक्षा न देण्याची तरतूद या विधेयकात होती. मात्र, या विधेयकाला देशभरातून मोठा विरोध होत होता. ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली. निवेदने प्रसिद्घ करण्यात आली. या विधेयकावर आज मतदान होणार होते; पण त्यापूर्वीच ते मागे घेतल्याची घोषणा पंतप्रधान बिनाली यिल्डीरिम यांनी केली. या विधेयकावर सार्वमत घेणार असल्याचे अध्यक्ष रिसेप ताईप एर्दोगान यांनी काल रात्री उशिरा "अनादोलू' या सरकारी मालकीच्या वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले होते.

Web Title: Leave behind child marriage bill in Turkey