Joe Biden Cancer : बायडेन यांना कॅन्सरची लागण; छातीतून त्वचेच्या कॅन्सरची गाठ काढली! | Lesion removed from Joe Bidens chest was cancerous says White House doctor | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Joe Biden
Joe Biden Cancer : बायडेन यांना कॅन्सरची लागण; छातीतून त्वचेच्या कॅन्सरची गाठ काढली!

Joe Biden Cancer : बायडेन यांना कॅन्सरची लागण; छातीतून त्वचेच्या कॅन्सरची गाठ काढली!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे. बायडेन यांच्या छातीमधून एक गाठ काढण्यात आली. ही गाठ त्वचेच्या कॅन्सरची असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

डॉक्टर केविन ऑ कोनोर हे दीर्घकाळापासून जो बायडेन यांच्यावर उपचार करत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बायडेन यांच्या शरीरातून कॅन्सरच्या सर्व गाठी काढून टाकण्यात आलेल्या आहे. आता त्यांना पुढच्या उपचारांची गरज नाही.

गाठ काढल्यानंतर आता जो बायडेन यांची प्रकृती स्थिर असून ते सध्या सावरत असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं. तसंच त्यांचे रेग्युलर स्कीन स्क्रिनिंग्स लवकरच सुरू होतील, असंही ते म्हणाले आहेत. बेसल सेल्स हा कॅन्सरच्या पेशींचा सामान्यपणे आढळणारा आणि सुलभ उपचार करता येणारा प्रकार आहे.

जेव्हा लवकर निदान होतं, तेव्हा त्याच्यावर उपचार करणं सोपं असतं आणि रुग्णाला लवकर बरंही करता येतं, असं डॉ. कोनोर यांनी सांगितलं. तसंच या पेशी कॅन्सरच्या इतर पेशींसारख्या पसरत नाही, मात्र त्यांचा आकार वाढू शकतो. त्यामुळे त्यांना काढून टाकणं गरजेचं असतं, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

जो बायडेन यांच्या परिवारामध्ये आणखी काही जणांना कर्करोगाने ग्रासलं आहे. बायडेन यांच्या तरुण मुलाचा २०१५ साली मेंदूच्या कॅन्सरने मृत्यू झाला.