esakal | Video: वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी कोसळली वीज!
sakal

बोलून बातमी शोधा

lightning strikes during wedding video viral

निसर्गरम्य वातावरणात मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा संपन्न होत होता. यावेळी वीज कडाडली आणि उपस्थितांना धस्स झाले.

Video: वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी कोसळली वीज!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

बॉस्टन: निसर्गरम्य वातावरणात मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा संपन्न होत होता. यावेळी वीज कडाडली आणि उपस्थितांना धस्स झाले. सुदैवाने कोणी जखमी झालेले नाही. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी वीज कोसळली असावी, अशा प्रतिक्रिया नेटिझन्स नोंदवत आहेत.

Video: गाढवाच्या तोंडात अडकला साप अन्...

ऍरॉन शॉविस्की आणि डेनिस मॅक्लर या दोघांचा विवाह सोहळा संपन्न होत होता. विवाहाच्या काळी वेळे आधी कडक उन पडले होते. पण, विवाहादरम्यान पावसाळी वातावरण निर्माण झाले होते. विवाह सोहळा सुरू असतानाच जोरात वीज कडाडली. वधू-वरांसह उपस्थितही हादरले. सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. पण, संबंधित क्षण मोबाईलमध्ये कैद झाला असून, व्हिडिओ व्हायरल होत आहे. दोघांच्या आणखी एका फोटोमध्ये मागे इंद्रधनुष्यही दिसत असून निसर्गाचे वरदान आहे. वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी वीज कोसळली असावी, अशा प्रतिक्रिया नेटिझन्स नोंदवत आहेत.

ऍरॉन शॉविस्कीने स्वत: हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करताना म्हटले आहे की, 'वीज कोसळल्यामुळे सर्व पाहुणे मंडळीही घाबरले होते. पण, कोणीही जखमी झालेले नाही. पावसाला सुरवात होण्यापूर्वी विवाह सोहळा पार पडला.'

सनी लिओनीने घेतला 'बीए'ला प्रवेश!

loading image