समुद्रकिनारी राहणे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

समुद्रकिनाऱ्यापासून अर्ध्या मैलावर राहणाऱ्या लोकांच्या आरोग्याचा अभ्यास केल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे.

एक्‍सेटर : सध्या ताणतणावाच्या आयुष्यात अनेक मानसिक त्रासांनी आपण ग्रासलेलो आहोत. मात्र अशा परिस्थितीत समुद्रकिनारी राहणे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी उत्तम असल्याचा निष्कर्ष एका युकेच्या विद्यापीठातील अभ्यासातून निघाला आहे.

समुद्रकिनाऱ्यापासून अर्ध्या मैलावर राहणाऱ्या लोकांच्या आरोग्याचा अभ्यास केल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे. तसेच हे लोक   नैराश्‍यासारख्या समस्यांपासून दूर असल्याचेही दिसून आले आहे. मनुष्याची मानसिक स्थिती आणि नैसर्गिक वातावरण यांच्यात घनिष्ठ संबंध असतो. त्यामुळेच आजूबाजूच्या परिसराचा आणि वातावरणाचा थेट परिणाम व्यक्तीच्या माणसिक स्थितीवर होत असतो.  

युकेतील एका विद्यापीठाच्या काही शास्त्रज्ञांनी सुमारे 26 हजारांवर व्यक्तींचे सर्वेक्षण केले; समुद्रकिनाऱ्यापासून 1 कि.मी.च्या अंतरावर राहणाऱ्या व्यक्तींना मानसिक त्रास होण्याची शक्‍यता इतरांच्या तुलनेत कमी असते. विशेष म्हणजे यात असाही निष्कर्ष निघाला आहे की, समुद्रकिनाऱ्यापासून जवळ राहणाऱ्या व्यक्तीचे मासिक उत्पन्न हे किनाऱ्यापासून लांब राहणाऱ्या व्यक्तीपेक्षा कमी असले, तरीदेखील त्यांचे मानसिक आरोग्य मात्र उत्तम असते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Living on the beach is beneficial for your mental health