Lockdown in France : पुन्हा लॉकडाउनचा निर्णय; 700 किमीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा!

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 31 October 2020

फ्रान्सचे राष्ट्रपती इमेन्युअल मॅक्रोन यांनी शुक्रवारी रात्रीपासून देशव्यापी लॉकडाऊन होणार असल्याचे जाहीर केले होते. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, शॉप मॉल बंद करण्याचे आदेश फ्रान्समध्ये जारी करण्यात आले आहे.

पॅरिस : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  फ्रान्ससह युरोपातील अन्य काही देशात पुन्हा एकदा लॉकडाउनची नामुष्की ओढावली आहे. फ्रान्सने लॉकडाउची घोषणा देखील केली. यामुळे पॅरिसमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. याठिकाणी वाहनांच्या जवळपास 730 किलोमीटर (454 मैल) लांबच्या लांब रांगा लागल्याचे चित्र निर्माण झाले होते. नव्याने लागू होणाऱ्या लॉकडाउनमुळे शहरात येणाऱ्या आणि शहरातून बाहेर जाणाऱ्या तसेच शहरात येणाऱ्या लोकांमुळे मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी शुक्रवारी रात्रीपासून देशव्यापी लॉकडाऊन होणार असल्याचे जाहीर केले होते. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, शॉप मॉल बंद करण्याचे आदेश फ्रान्समध्ये जारी करण्यात आले आहे. जनतेला घराबाहेर पडू नये, असे आवाहन देखील सरकार आणि प्रशासनाने केले आहे. ब्रिटनमधून फ्रान्समध्ये येण्यावर देखील निर्बंध घालण्यात आले आहेत. सरकारच्या परवानगीशिवाय कोणालाही देशात प्रवेश मिळणा नाही. 

Second Wave of Coronavirus in Europe: भारतात कोरोना विषाणूची भिती अद्याप कायम असताना युरोपात कोराना विषाणूची दुसरी लाट आली आहे. युरोपातील देश पहिल्या लॉकडाउनमधून सावरत असताना आता पुन्हा दुसऱ्यांदा त्यांनी लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे. याठिकाणी  शुक्रवारपासून पुन्हा लॉकडाउनची अंमलबजावणी सुरु झाली आहे.  दुसऱ्या लॉकडाउनमध्ये बार आणि रेस्टोरंटवरही बंदी घालण्यात आली आहे. अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडणाऱ्या लोकांना घराबाहेर पडता येणार आहे. यासाठी त्यांच्याकडे अत्यावशक कामासंदर्भातील कागदपत्रे असावी लागतील. 

जर्मनीमध्ये देखील पुन्हा एकदा लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे. फ्रान्स आणि जर्मनीमध्ये ब्रिटनच्या तुलनेत कोरोनाचे रुग्ण कमी प्रमाणात आढळत आहेत. तरी देखील या देशांनी जोखीम न स्वीकारता पुन्हा एकदा लॉकडाउनचा निर्णय घेतलाय. दुसऱ्यांदा देशव्यापी लॉकडाउनची घोषणा झाल्यानंतर युरोपच्या अर्थव्यवस्थेत पुन्हा घसरण पाहायला मिळाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lockdown in France Paris region faced traffic jams with length of 730 kilometers