लंडनमध्ये मशिदीबाहेर नागरिकांना चिरडले; एकाचा मृत्यू

वृत्तसंस्था
सोमवार, 19 जून 2017

फिन्सबरी पार्क येथील मशिदीतून नागरिक नमाज पठण करून बाहेर पडत असताना एका मोटार चालकाने भारधाव वेगाने गाडी चालवत नागरिकांना चिरडले. रमजान महिना सुरु असल्याने मशिदीत गर्दी होती.

लंडन - लंडनमधील फिन्सबरी पार्क येथे एका मशिदीबाहेर मोटार भरधाव वेगाने चालवत नागरिकांना चिरडल्याची घटना घडली आहेत. या मध्ये एका नागरिकाचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिन्सबरी पार्क येथील मशिदीतून नागरिक नमाज पठण करून बाहेर पडत असताना एका मोटार चालकाने भारधाव वेगाने गाडी चालवत नागरिकांना चिरडले. रमजान महिना सुरु असल्याने मशिदीत गर्दी होती. या गर्दीला लक्ष्य करूनच हल्ला करण्यात आला. यामध्ये एका नागरिकाचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. रविवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली.

या घटनेला अद्याप दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले नाही. मुस्लिम नागरिकांना लक्ष्य करून हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे. गाडीच्या धडकेनंतर अनेक नागरिक जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून होते, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. लंडनमध्ये नुकतेच दहशतवादी हल्ले झाले आहेत.

Web Title: London Finsbury Park attack: Counter terror police investigating after one man killed in van attack near mosque