आशिया-प्रशांत देशांशी ब्रिटनची दोस्ती

आशिया-प्रशांत देशांशी ब्रिटनची दोस्ती

लंडन - युरोपीय महासंघातून बाहेर पडून वर्ष उलटल्यावर ब्रिटनने महत्त्वाचा निर्णय घेतला असून आशिया-प्रशांत मुक्त व्यापार विभागात सहभागी होण्यासाठी अर्ज करायचे ठरविले आहे.

सर्वंकष आणि प्रागतिक ट्रान्स-पॅसिफिक भागीदारी (कॉम्प्रीहेन्सीव अँड प्रोग्रेसीव ट्रान्स-पॅसिफीक पार्टनरशिप-सीपीटीपीपी) असे या संयुक्त भागीदारी संघटनेचे नाव आहे. ब्रिटन चार दशकांहून जास्त काळासाठी युरोपीय महासंघाचा प्रमुख सदस्य होता. आता ब्रेक्झीटनंतरच्या योजनांचा एक भाग म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यासाठी ब्रिटन आणि भागीदार संघटनेत या वर्षी वाटाघाटी सुरु होण्याची अपेक्षा आहे.

ब्रिटनच्या आंतरराष्ट्रीय व्यापार सचिव लिझ ट्रुस ब्रिटनच्या सदस्यत्वासाठी औपचारिक विनंती अर्ज करतील. ही भागीदारी स्थापन झाल्यानंतर त्यातील सहभागासाठी अर्ज करणारा ब्रिटन हा पहिला नवा देश ठरला आहे. यासाठी लिझ ट्रुस यांनी पुढाकार घेतला आहे.

काय आहे  सीपीटीपीपी
चीनचा आर्थिक क्षेत्रातील वाढत्या प्रभावाला रोखण्याच्या उद्देशाने २०१९ मध्ये आशिया-पॅसिफीकमधील देश एकत्र
पॅसिफीक वर्तुळातील ११ देशांचा सहभाग
ऑस्ट्रेलिया, ब्रुनेई, कॅनडा, चिली, जपान, मलेशिया, मेक्सिको, न्यूझीलंड, पेरू, सिंगापूर आणि व्हिएतनाम यांच्यात करार
या देशांची एकत्रित लोकसंख्या ५० कोटीच्या घरात
बराक ओबामा आपल्या कारकिर्दीत अशा भागिदारीसाठी समर्थक
डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर मात्र अमेरिकेची पाठ
गेल्या वर्षी काही प्रमुख तज्ज्ञांचे अमेरिकेला सहभागाचे आवाहन

युरोपीय महासंघातून बाहेर पडल्यानंतर वर्षभराने आम्ही नव्या भागिदाऱ्यांसह आगेकूच सुरु केली आहे. त्यामुळे ब्रिटिश जनतेला प्रचंड आर्थिक फायदे होतील. या अर्जामुळे जगभरातील मित्र देश आणि भागिदारांसह व्यवसाय करण्याची महत्त्वाकांक्षा आणि जागतिक मुक्त व्यापाराचा उत्साही अन्् खंदा समर्थक बनण्याची आमची मनिषा दिसून येते.
- बोरीस जॉन्सन, ब्रिटनचे पंतप्रधान

आशिया-प्रशांत भागीदारीमुळे विपुल संधी निर्माण होतील. त्यामुळे कार, व्हिस्की उत्पादकांना कमी आयात कर द्यावा लागेल. आमच्या सेवापुरवठादारांना सरस वाव मिळून दर्जेदार नोकऱ्यांची निर्मिती करता येईल. ज्यातून आमच्या लोकांची देशातच आणखी भरभराट होईल.
- लिझ ट्रुस, ब्रिटनच्या व्यापार मंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com