भारत - चीन युद्धाची शक्‍यता?

यूएनआय
मंगळवार, 23 जानेवारी 2018

लंडन - चीन आणि भारत ही दोन्ही राष्ट्रे अण्वस्रसज्ज असून, त्यांच्यात अणुयुद्ध होऊ शकते का? यावरून अनेक मतमतांतरे व्यक्त केली जात आहेत. मात्र, डोकलामच्या मुद्‌द्‌यावरून भारत आणि चीनच्या दरम्यान युद्धाचा भडका उडू शकतो, अशी शक्‍यता लंडनमधून प्रकाशित होणाऱ्या ‘द डेली स्टार’ या वृत्तपत्राने वर्तविली आहे. डोकलामवरून भारत आणि चीनच्या दरम्यान युद्ध सुरू झाले तर जगभरातील इतर महासत्ताही त्यात उतरतील आणि त्याला तिसऱ्या महायुद्धाचे स्वरूप प्राप्त होईल, अशी भीतीही वर्तविण्यात आली आहे. 

वादग्रस्त ठरलेल्या डोकलामच्या पठारावर चीनच्या लष्करी वाहनांची उपस्थिती दिसून आल्यानंतर या मुद्‌द्‌यावरून तणाव वाढला असून, त्यामुळे या दोन देशांमध्ये युद्धाला तोंड फुटू शकते, अशी शक्‍यता ‘द डेली स्टार’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखात वर्तविण्यात आली आहे. 

डोकलाममधील मोक्‍याच्या ठिकाणांवरील भारतीय चौक्‍यांपासून अवघ्या दहा मीटर अंतरापर्यंतच्या जमिनीवर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) सैनिकांनी ताबा मिळविला असल्याचे दर्शविणारी उपग्रहाद्वारे टिपण्यात आलेली छायाचित्रे नुकतीच समोर आली आहेत. या घडामोडींमुळे वाढत्या तणावाचे रूपांतर युद्धात होऊ शकते, अशी शक्‍यता ‘द डेली स्टार’ने वर्तविली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: london news chances of India China war