लंडन मेट्रो स्फोट: संशयित हल्लेखोरास अटक

वृत्तसंस्था
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

"इसिस'ने घेतली जबाबदारी; सुरक्षेत आणखी वाढ

लंडन: येथे भूमिगत मेट्रोतील बॉंबस्फोटप्रकरणी एका अठरावर्षीय व्यक्तीस पोलिसांनी आज अटक केली. डोव्हरमधील पोर्ट एरियातील एका स्थानकावरून केंट पोलिसांनी या व्यक्तीस ताब्यात घेतले. याबाबत माध्यमांशी बोलताना सहायक पोलिस उपायुक्त नेल बसू म्हणाले, की ""ही अटकेची कारवाई महत्त्वपूर्ण असून यातून अनेक धागेदोरे हाती येऊ शकतात.'' दहशतवाद्यांनी शुक्रवारी मेट्रोत घडवून आणलेल्या "आयईडी'च्या स्फोटामध्ये 29 प्रवासी जखमी झाले होते. "इसिस'ने या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर गृहसचिव अम्बर रूड यांनी आज दुपारी तातडीने कोब्रा समितीची बैठक घेतली. या हल्ल्याप्रकरणी तपास यंत्रणांनी 45 साक्षीदारांचे जबाब नोंदवून घेतले असून, आतापर्यंत यंत्रणांच्या हाती 77 छायाचित्रे आणि व्हिडिओ लागले आहेत. हल्लेखोरांना पकडण्यासाठी लोकांनी त्यांच्याजवळील व्हिडिओ आमच्या संकेतस्थळावर अपलोड करावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

आक्रमक शोधमोहीम
हल्लेखोरांच्या मुसक्‍या आवळण्यासाठी ब्रिटिश पोलिसांनी आक्रमक शोधमोहीम राबविली आहे. संशयितांना ताब्यात घेण्यासाठी तपास यंत्रणा विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पडताळून पाहत आहेत. या स्फोटासाठी वापरण्यात आलेली स्फोटके घरीच तयार करण्यात आली असावीत आणि नंतर ती मेट्रोमध्ये ठेवण्यात आली, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सुरक्षेत वाढ
दहशतवाद्यांकडून पुन्हा हल्ला होण्याच्या भीतीने दक्षतेची पातळी वाढविण्यात आली आहे. आता महत्त्वाच्या स्थळांवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली असून, सशस्त्र पोलिसांच्या जागी लष्करी अधिकारी नियुक्त केले जाणार आहेत. खुद्द पंतप्रधान थेरेसा मे यांनीच तशी घोषणा केली आहे. मागील अकरा वर्षांमध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Web Title: london news london metro blast Suspected militants arrested