आंदोलनात पोलिसांवर गोळीबार

वृत्तसंस्था
Friday, 25 September 2020

ब्रिओना 26 वर्षांची होती. ती वैद्यकीय कर्मचारी होती.13 मार्च रोजी तिच्या घरावर तीन पोलिसांनी छापा घातला. त्यावेळी तिला सहा गोळ्या झाडण्यात आल्या.लुईव्हील येथील न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सुरु आहे.

लुईव्हील, केंटुकी - कृष्णवर्णी तरुणी ब्रिओना टेलर हिच्या मृत्युप्रकरणी सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. तिच्यावर गोळ्या झाडलेल्या पोलिसांवर आरोपपत्र दाखल न करण्याच्या न्यायालयाच्या निर्णयानंतर दोन पोलिसांवर येथे गोळ्या झाडण्यात आल्या.

हे पोलिस जखमी झाले असले तरी त्यांना झालेल्या जखमा प्राणघातक नाहीत. याप्रकरणी एका संशयिताला अटकही झाली. शहरात आणीबाणी लागू करण्यात आली असून राष्ट्रीय दलाच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे. पुढील तीन दिवस रात्री नऊ ते सकाळी सहा या वेळेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे, पण अजूनही आंदोलक मोठ्या संख्येने जमत आहेत.

न्यायालयाच्या निर्णयानंतर न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, अटलांटा आणि शिकागो येथेही निदर्शने झाली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ब्रिओना 26 वर्षांची होती. ती वैद्यकीय कर्मचारी होती. 13 मार्च रोजी तिच्या घरावर तीन पोलिसांनी छापा घातला. त्यावेळी तिला सहा गोळ्या झाडण्यात आल्या. लुईव्हील येथील न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सुरु आहे. त्यात केवळ एकाच पोलिस अधिकाऱ्यावर किरकोळ गुन्हा दाखल करण्यात आला. त्याने झाडलेली गोळी शेजारील इमारतीत घुसली होती. अॅटर्नी जनरलने इतर दोन पोलिस अधिकाऱ्यांच्या कृत्यांचे समर्थन केले.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मित्राने गोळी झाडल्याने...
पोलिसांनी छापा टाकला तेव्हा ब्रिओनाला मित्र घरात उपस्थित होता. त्याने एक गोळी झाडली होती. तिचा आधीचा मित्र घरात बळजबरीने घुसल्याचा समज झाल्यामुळे गोळी झाडल्याची माहिती त्याने नंतर पोलिसांना दिली होती. मात्र त्याच्या गोळीबाराला पोलिसांनी प्रत्यूत्तर दिले. त्यात ब्रिओनचा बळी गेला.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Louisville, Kentucky Police fired on protesters