मला डेटला घेऊन जायचं असेल तर हे कर...

वृत्तसंस्था
सोमवार, 2 मार्च 2020

मी एका मुलाला मजेत म्हटले होते की जर मला डेटला घेऊन जायचे असेल तर मला एक कव्हर लेटर पाठव आणि त्याने खरंच रिझ्युम पाठवला आहे. संबंधित लेटर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कॅलिफोर्निया : मी एका मुलाला मजेत म्हटले होते की जर मला डेटला घेऊन जायचे असेल तर मला एक कव्हर लेटर पाठव आणि त्याने खरंच रिझ्युम पाठवला आहे. संबंधित लेटर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तिने आजोबांना केला स्पर्श अन् तिथेच फसले...

जेम्स हा कॅलिफोर्नियात सॅन दिएगो विद्यापीठात शिक्षण घेत असून, त्याचा बायोडाटा व्हायरल होऊ लागल्यापासून चर्चेत आला आहे. जेम्सला एक मुलगी आवडत असून, तिला डेटला घेऊन जाण्याची त्याची इच्छा होती.  त्यासाठी त्याने चक्क बायोडाटाचा वापर केला आहे. या बायोडाटामध्ये जेम्सने स्वत:बद्दलची माहिती दिली आहे. यामध्ये आपण खुपच मजेशीर असल्याचे म्हटले असून आईचा लाडका असल्याचे लिहीले आहे. विशेष म्हणजे त्याने यापूर्वी डेट केलेल्या दोन मुलींचा संदर्भ दिला आहे.

जेम्सने ख्रिस्टी नावाच्या मुलीला हा बायोडाटा पाठवला आहे. त्यानंतर ख्रिस्टीने हा रिझ्युम तिच्या ट्विटरवरून शेअर केला आहे. त्यात ख्रिस्टीने म्हटलं की, 'मी एका मुलाला मजेत म्हटले होते की जर मला डेटला घेऊन जायचे असेल तर मला एक कव्हर लेटर पाठव आणि त्यानं खरंच बायोडाटा पाठवला.'

लग्न मंडपात प्रियकराने लगावली नवरीच्या कानशिलात...

दरम्यान, सोशल मीडियावर या बायोडाटावर अनेकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या असन, जेम्सच्या क्रिएटिव्हीचे कौतुक केले आहे तर काहींनी टीकाही केली आहे.

पत्नी म्हणाली मला एकदा तरी त्याच्याशी बोलू द्या...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lover send resume to girl for a date she share on twitter