उंदरामुळे वाचले हजारोंचे प्राण; ७१ सुरुंगांचा लावला शोध

उंदराने वाचवले हजारोंचे प्राण
rat
rat

कुत्रा, मांजर किंवा अन्य प्राण्यांच्या साहसकथा आपण अनेकदा ऐकल्या आहेत. अमूक एका श्वानामुळे मालकाचे प्राण वाचले किंवा अमूक एका मांजरीमुळे मालकाच्या मृत्यूचा शोध लागला वगैरे अशा अनेक घटना आपण सर्रास ऐकतो. परंतु, कधी उंदराची साहस कथा ऐकली आहे का? अर्थात नाही. आपण केवळ उंदिर-मांजर यांच्यातील भांडण, किंवा उंदराचं साहस कार्टूनमध्ये पाहिलं आहे. नाहीतर इतरवेळी उंदरामुळे होणारा उपद्रवाच्याच चर्चा ऐकत असतो. परंतु, सध्या अशा एका उंदराची चर्चा रंगली आहे. ज्यामुळे प्रत्यक्षात हजारो लोकांचे प्राण वाचले आहेत. (magawa-a-landmine-detecting-rat-retiring-after-five-years-of-life-saving-work-in-cambodia)

'sky'च्या वृत्तानुसार,आफ्रिकेतील एका उंदरामुळे खरंच हजारो लोकांचे प्राण वाचले आहेत. या उंदराने ७१ सुरुंगांचा शोध लावला आहे. ज्यामुळे होणारं मोठं संकट टळलं आहे.

rat
कोरोना झाल्यानंतर चव आणि वास का जातो?

या उंदराचं नाव मगावा असून तो सात वर्षांचा आहे. या उंदराने कंबोडियामध्ये तब्बल ७१ सुरुंगांचा शोध लावला आहे. केवळ आपल्या हुंगण्याच्या क्षमतेवरुन त्याने या सुरुंगांचा शोध लावला. त्यात २८ जिवंत स्फोटके होती. मगावाने शोध लावलेले सुरुंग १९७० ते १९८० या काळातील होती.

"मगावा लहान आहे. पण त्याच्यामुळे हजारो लोकांचे प्राण वाचले आहेत. त्याच्यासोबत काम करतांना कायम माझी मान गर्वाने उंच होते. मगावा आता निवृत्त होणार आहे.परंतु, त्याची उणीव भरुन काढणं कठीण आहे. परंतु, चॅपिटीने काही नव्या उंदरांची नियुक्ती केली आहे. ज्यात २० प्रशिक्षित उंदीर आहेत. जे लँडमाइन डिटेक्शन असून त्यांनी नुकतीच प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आहे", असं मगावाचे हॅडलर मालेन यांनी सांगितलं.

rats
rats

मगावाला एपीओपीओ नामक संघटनेने ट्रेन केलं असून तो त्याच्या हुंगण्याच्या कौशल्यामुळे सुरुंग आणि स्फोटकांचा शोध लावतो. मात्र, आता त्याच्या निवृत्तीची वेळ जवळ आली आहे.

दरम्यान, ब्रिटनच्या एका चॅरिटी संस्थेने पीडीएसएसकडून मगावाला सन्मानित करण्यात आलं आहे.पीडीएसएस ही एक प्राण्यांसाठीची खास संघटना असून साहसपूर्ण आणि उत्तम काम करणाऱ्या प्राण्यांचा सन्मान करते. विशेष म्हणजे ७७ वर्षांच्या इतिहासात त्यांनी पहिल्यांदाच एका उंदराचा सन्मान केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com