रशियास 7.8 रिश्‍टर स्केल भूकंपाचा धक्का;जीवितहानी नाही

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 जुलै 2017

भूकंपाचे केंद्रस्थान कामाश्‍चाटका द्वीपकल्पापासून जवळच असलेल्या बेरिंग बेटावरील नोकोल्सकोय शहरापासून सुमारे 200 किमी अंतरावर होते. समुद्रगर्भापासून अवघ्या सहा मैल खोलीवर हा भूकंप झाला

वॉशिंग्टन - "रशियाच्या कामाश्‍चाटका द्वीपकल्पास शक्तिशाली भूकंपाच्या बसलेल्या धक्‍क्‍यानंतर त्सुनामी लाटांचा इशारा देण्यात आला होता. मात्र आता हा धोका टळला असल्याची,' माहिती अमेरिकेमधील भूमापन सर्वेक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. या भूकंपाची तीव्रता तब्बल 7.8 रिश्‍टर स्केल इतकी होती.

भूकंपाचे केंद्रस्थान कामाश्‍चाटका द्वीपकल्पापासून जवळच असलेल्या बेरिंग बेटावरील नोकोल्सकोय शहरापासून सुमारे 200 किमी अंतरावर होते. समुद्रगर्भापासून अवघ्या सहा मैल खोलीवर हा भूकंप झाला. या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. या शक्तिशाली भूकंपानंतर या प्रदेशास अनेक छोटे-मोठे धक्के जाणवले.

Web Title: Magnitude 7.8 quake between Russia and Alaska

टॅग्स