सॉलोमन बेटांना भूकंपाचा धक्का

वृत्तसंस्था
रविवार, 22 जानेवारी 2017

सॉलोमन बेटे ही भूकंपप्रवण क्षेत्रात येत असल्यामुळे याठिकाणी सतत भूकंपाचे धक्के बसत असतात.

वेलिंग्टन - प्रशांत महासागरातील सॉलोमन बेटांना आज (रविवार) सकाळी जोरदार भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाच्या धक्क्यानंतर सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.

अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सॉलोमन बेटांना आज सकाळी बसलेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 8.0 इतकी होती. या धक्क्यामुळे सुनामीचा इशारा देण्यात आला असून, किनाऱ्यावरील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. पपुआ न्यू गयाना येथील अरावा येथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता.

सॉलोमन बेटे ही भूकंपप्रवण क्षेत्रात येत असल्यामुळे याठिकाणी सतत भूकंपाचे धक्के बसत असतात. आज झालेल्या भूकंपामुळे अद्याप जिवीत व वित्तहानी झाल्याचे वृत्त आलेले नाही. 

Web Title: Magnitude 8 quake hits Solomon Islands, tsunami possible