महाराष्ट्रानंतर बंगालमध्येही भाजपला झटका; वाचा देश-विदेशच्या महत्त्वाच्या 7 बातम्या

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 21 October 2020

दिवसभरातील देश-विदेशच्या महत्वाच्या बातम्या येथे वाचा

महाराष्ट्रात दिग्गज नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम केल्यानं पक्षाला राज्यात धक्का बसला आहे. त्यानंतर आता पश्चिम बंगालमधूनही भाजपला दणका दिला आहे. कराचीमधील गुलशन-ए-इक्बालमध्ये मस्कन या इमारतीत स्फोट होऊन दोन मजले उद्ध्वस्त झाले आहेत.

मोठी बातमी - कांद्याची भाववाढ रोखण्यासाठी केंद्राने उचललं पाऊल

सणासुदीच्या काळात कांद्याचे भाव वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, भाववाढ थांबवण्यासाठी सरकारने कांद्याच्या आयात नियमांमध्ये शिथिलता आणली आहे. तसंच कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी बफर स्टॉकपेक्षा जास्त कांदा बाजारात पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्यावतीने ही माहिती देण्यात आली. सविस्तर बातमी-

पंजाब, महाराष्ट्रानंतर बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का

महाराष्ट्रात दिग्गज नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम केल्यानं पक्षाला राज्यात धक्का बसला आहे. त्यानंतर आता पश्चिम बंगालमधूनही भाजपला दणका दिला आहे. गोरखा जनमुक्ती मोर्चाचे प्रमुख विमल गुरुंग यांनी म्हटलं की, केंद्राने गोरखालँडबाबत दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही त्यामुळे आम्ही एनडीएतून बाहेर पडत आहे. सविस्तर बातमी-

वर्क फ्रॉम होमच्या त्रासाला कंटाळून इंजिनिअरची आत्महत्या 

र्क फ्रॉम होमच्या त्रासाला कंटाळून एका इंजिनिअरने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नुकताच त्याचा विवाह ठरला होता. विवाहापूर्वीच त्याने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. सविस्तर बातमी-

सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट! बोनससाठी केंद्राची 3 हजार 737 कोटी रुपयांना मंजुरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकार 30 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीला बोन भेट देणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. सविस्तर बातमी-

राज ठाकरेंच्या तामिळनाडुतील कट्टर चाहत्याचे निधन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वेगळा चाहतावर्ग आहे. मनसे हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित पक्ष असला तरी राज ठाकरे यांचे चाहते इतर पक्षांमध्ये आणि राज्याच्या बाहेरही आहेत. तामिळनाडुतील शिवा बालन असं नाव असलेल्या राज ठाकरेंच्या चाहत्याचे रविवारी निधन झाले. सविस्तर बातमी-

कराचीत स्फोटात इमारतीचे दोन मजले गायब 

कराचीमधील गुलशन-ए-इक्बालमध्ये मस्कन या इमारतीत स्फोट होऊन दोन मजले उद्ध्वस्त झाले आहेत. स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला असून, 15हून अधिक जण जखमी झाले आहेत. इमारतीच्या परिसरातील अनेक इमारतींच्या खिडक्यांचेही नुकसान झाले आहे. सविस्तर बातमी-

रोहिंग्या मुस्लिमांच्या मदतीला आले रेस्टॉरंट मालक; मोफत वाटतायंत जेवण

आपल्या देशातून परागंदा व्हावे लागलेल्या रोहिंग्या मुस्लीमांना अनेक देशामध्ये शरण घ्यावे लागले आहे. निर्वासितांचे जीवन जगत असलेल्या रोहिंग्या मुस्लिमांना कोरोनाच्या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशात मानवतेच्या दृष्टीकोनातून दिल्लीतील रेस्टॉरंट मालकांनी नवरात्रीच्या निमित्ताने रोंहिग्या मुस्लीमांना मुफ्तमध्ये अन्नाचे वाटप केले आहे. सविस्तर बातमी-

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra bjp congress eknath khadse Afghanistan onion government employee