म. गांधींच्या टपाल तिकिटांची पाच लाख पौंडांना विक्री

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

लंडन: ब्रिटनमध्ये झालेल्या लिलावात महात्मा गांधींचे चित्र असलेल्या चार दुर्मिळ टपाल तिकिटांची पाच लाख पौंडांना विक्री झाली आहे. कोणत्याही भारतीय टपाल तिकिटाला आतापर्यंत मिळालेली ही सर्वाधिक किंमत असल्याचे विक्रेत्याने सांगितले.

1948 मध्ये गांधींचा चेहरा असलेले दहा रुपयांची टपाल तिकिटे वितरित करण्यात आले होते. गुलाबी, तपकिरी रंगाचे ही केवळ तेरा टपाल तिकिटे सध्या विविध संग्राहकांकडे आहेत. त्यातीच चार तिकिटांचा सेट ऑस्ट्रेलियातील खासगी तिकीट संग्राहकाने विकत घेतला. भारतीय टपाल तिकिटाला मिळालेली ही सर्वाधिक किंमत असल्याचे ब्रिटनमधील "स्टेनली गिब्बन्स' या लिलाव करणाऱ्या कंपनीने निवेदनात म्हटले आहे. यातील उर्वरित तिकिटे राणी एलिझाबेथ यांच्या मालकीच्या रॉयल संग्रहाकडे आहेत.

नुकत्याच मार्च महिन्यात झालेल्या अन्य एका लिलावात भारतातील प्रसिद्ध "चार आण्या'ची एक लाख दहा हजार पौंडांना विक्री झाली होती. या लिलावात एका टपाल तिकिटाला 9.5 डॉलर्स इतकी विक्रमी किंमत मिळाली होता. गेल्या काही वर्षांत भारतीय जुन्या वस्तूंना जगभरात मागणी वाढली असून त्याला मोठी किंमतही मिळत आहे. जगभरातील भारतीय तसेच वेगवेगळ्या देशांतील संग्राहक त्याची खरेदी करीत असल्याचेही कंपनीचे कार्यकारी संचालक केथ हेडल यांनी सांगितले.

Web Title: mahatma gandhi postage stamp