'चॉकलेट टेस्टर'चा जॉब हवाय..?

वृत्तसंस्था
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

इलिनॉय (अमेरिका) - वाईन टेस्टर, परफ्यूम टेस्टर यामध्ये करिअर करणारे आहेतच. परंतु, तुम्ही जर चॉकलेटचे फॅन असाल तर आता चॉकलेट टेस्टिंगमध्ये देखील करिअर करता येणे शक्य आहे. तुम्ही उत्तम चॉकलेट टेस्टर झालात तर 'मॉन्डलेझ इंटरनॅशनल' ही कंपनी तुम्हाला लगेच नोकरी देखील देणार आहे. 

विविध प्रकारच्या कॅटबरीज् आणि ओरिओ (बिस्किटे) बनविणारी ही कंपनी चांगल्या चॉकलेट टेस्टरच्या शोधात आहे. मात्र ही नोकरी करण्यासाठी विविध पातळ्यांवर तुम्हाला खरे उतरावे लागणार आहे. नुसतेच चॉकलेट खाण्याची आवड असून चालणार नाही. त्यासाठी कंपनी तुमच्या काही टेस्ट घेणार आहे. यामध्ये तुमच्या 'टेस्टबर्ड्स' चांगल्या आहेत की नाही, तुम्ही कंपनीच्या प्रॉडक्ट्स बद्दल प्रमाणिक प्रतिक्रीया देत आहात अथवा नाही हे कंपनी बघणार आहे. याशिवाय कंपनीच्या मागणीप्रमाणे तुमचे इंग्रजी आणि संवाद कौशल्य चांगले असणे देखील गरचेचे असणार आहे.

हा 'पार्ट टाईम' जॉब असून, यामध्ये एकूण अकरा जणांच्या टिम बरोबर काम करावे लागणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. 

Web Title: The Maker of Oreos Is Hiring a Professional Chocolate Taster