एकत्रित अमेरिका,भारत,जपानचा "इतर नौदलां'ना इशारा ! 

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 जुलै 2017

"मलबार 2017 मधून "इतर देशांच्या नौदलांना' आम्ही एकत्र आहोत, हाच महत्वाचा व्यूहात्मक संदेश देण्यात आला आहे. या सरावामुळे कोणत्याही "चुकीच्या राजनैतिक समीकरणा'ची शक्‍यताच उद्‌भवित नाही,'' अशी नेमकी प्रतिक्रिया अमेरिकेचे उच्चस्तरीय नौदल अधिकारी रिअर ऍडमिरल डी बायर्न यांनी या पार्श्‍वभूमीवर व्यक्त केली

चेन्नई - भारत-भूतान-चीन या "ट्रायजंक्‍शन' (डोक ला) जवळ भारतीय लष्कर व चिनी सैन्य एकमेकासमोर उभे ठाकल्याने भारत व चीनमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवरच अमेरिका, जपान व भारत या तीन देशांच्या नौदलांच्या 21 व्या संयुक्त सरावास प्रारंभ झाला आहे.

"मलबार 2017 मधून "इतर देशांच्या नौदलांना' आम्ही एकत्र आहोत, हाच महत्वाचा व्यूहात्मक संदेश देण्यात आला आहे. या सरावामुळे कोणत्याही "चुकीच्या राजनैतिक समीकरणा'ची शक्‍यताच उद्‌भवित नाही,'' अशी नेमकी प्रतिक्रिया अमेरिकेचे उच्चस्तरीय नौदल अधिकारी रिअर ऍडमिरल डी बायर्न यांनी या पार्श्‍वभूमीवर व्यक्त केली. 

"या नौदल सरावाचा चीनवर मोठा परिणाम होईल,' असे मत अन्य एका अमेरिकन नौदल अधिकाऱ्याने आपले नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर व्यक्‍त केले. "आम्ही एकत्र आहोत, हे त्यांच्या लक्षात येईल. अशी एकता ही चांगलीच बाब आहे,' असे प्रतिपादन या अधिकाऱ्याने या पार्श्‍वभूमीवर व्यक्‍त केले. 

भारताचे व्हाईस ऍडमिरल एच सी एस बिश्‍त यांनी हा या सरावाचे उद्‌घाटन करताना "हा सराव म्हणजे समान आव्हाने व समान धोक्‍यांवर उपाययोजना करण्यासाठीचा एक प्रयत्न' असल्याची प्रतिक्रिया व्यक्‍त केली होती. मात्र हा सराव चीनविरोधात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे!

हा नौदल सराव बंगालच्या उपसागरात होत आहे. या सरावामध्ये अमेरिकेच्या पाच युद्धनौका, पोसेडॉन लढाऊ विमान आणि एक पाणबुडी यांनी, तर जपानच्या दोन युद्धनौकांनी सहभाग घेतला आहे. भारतातर्फे आयएनएस जलाश्‍व आणि आयएनएस विक्रमादित्य या युद्धनौका सरावात भाग घेतील.

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :
अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ला, 7 ठार
या हल्ल्याचा तीव्रपणे निषेध करावा : नरेंद्र मोदी
ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे निधन​

तळेगाव 'MIDC'तील चौथ्या टप्प्याला ग्रामस्थांचा तीव्र विरोध
मुकेश अंबानींच्या "ऍण्टिलिया'ला आग​

Web Title: Malabar exercise is a signal to China we are one: US commander