ट्रम्प यांचा निर्णय धक्कादायक - मलाला युसूफझाई

वृत्तसंस्था
शनिवार, 28 जानेवारी 2017

न्युयॉर्क - अनिश्चितता आणि अशांततेला बळी पडलेल्या निराधारांना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत प्रवेशबंदी घालू नये. त्यांचा हा निर्णय धक्कादायक आहे, या शब्दांत शांततेचा नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफझाई हिने ट्रम्प यांच्या मुस्लिम शरणार्थींना अमेरिकेत प्रवेशबंदीच्या निर्णयाची निंदा केली आहे. 

मलाला म्हणाली, की अमेरिकेला शरणार्थी आणि स्थलांतरितांच्या स्वागताचा अभिमानास्पद इतिहास आहे. त्याकडे अमेरिका पाठ फिरवत असून, या निर्णयाने ट्रम्प युद्ध आणि हिंसेपासून स्वतःला वाचवू पाहणाऱ्या शरणार्थींसाठी अमेरिकेचे दार बंद करत आहेत. सिरियातील निर्वासितांच्या मुलांची काही चूक नसतानाही ते गेल्या सहा वर्षांपासुन युद्धाचा त्रास सहन करत आहेत. या निर्वासितांना तुम्ही मदत केली, तर त्या बदल्यात ते कष्ट करण्यास तयार आहेत. त्यामुळे त्यांचा विचार करणे गरजेचे आहे.

अमेरिकेत परदेशी दहशतवाद्यांचा प्रवेश रोखण्यासाठी मुस्लिमांची संख्या सर्वाधिक असलेल्या सात राष्ट्रांतील शरणार्थींना पुढील 90 दिवसांसाठी अमेरिकेत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ट्रम्प यांनी यासंबंधीत अध्यादेशावर सही केल्यानंतर मलालाने त्यांना ही विनंती केली.

Web Title: Malala ‘heartbroken’ by Trump order