पाकिस्तानची प्रतिमा खराब होण्यास पाकिस्तानीच जबाबदार : मलाला 

वृत्तसंस्था
रविवार, 16 एप्रिल 2017

इस्लाम आणि पाकिस्तानला कशा प्रकारे बदनाम केले जात आहे, यावर आपण चर्चा करतो. परंतु कोणीही आपला देश आणि धर्म बदनाम करत नसून हे काम नागरिकच करत आहेत. यासाठी आपणच पुरेसे आहोत.

इस्लामाबाद : जगातील पाकिस्तानची प्रतिमा खराब होण्यास पाकिस्तानचे नागरिकच जबाबदार असल्याचे मत नोबेल पुरस्कार विजेती मलाला यूसुफजाईने व्यक्त केले. गेल्या काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या एका विद्यापीठात 'ईश्‍वरनिंदा'च्या आरोपावरून मशाल खान नावाच्या एका विद्यार्थ्याची हत्येचा निषेध करत मलालाने मत व्यक्त केले.

जगात पाकिस्तान आणि इस्लाम धर्माची प्रतिमा खराब करण्यासाठी कोणी अन्य नाही, तर खुद्द पाकिस्तानच जबाबदार आहे, असे मलाला म्हणाली.

मलाला हिने एका व्हिडिओत म्हटले की, इस्लाम आणि पाकिस्तानला कशा प्रकारे बदनाम केले जात आहे, यावर आपण चर्चा करतो. परंतु कोणीही आपला देश आणि धर्म बदनाम करत नसून हे काम नागरिकच करत आहेत. यासाठी आपणच पुरेसे आहोत.

मलाला म्हणाली की, मारलेल्या विद्यार्थ्याच्या वडिलाशी आपण चर्चा केली. मुलाची हत्या होऊनही वडील शांती आणि सहिष्णुतेबाबत बोलत असल्याचे मलाला म्हणाल्या. ही बाब केवळ एका युवकाच्या मृत्यूशी संबंधीत नाही, तर धर्माच्या मूळ संदेशाचीदेखील हत्या असल्याचे मलाला म्हणाली. आपण आपला धर्म विसरलो आहे. आपण आपले मूल्य आणि शिष्टाचार विसरलो आहोत. पाकिस्तानच्या राजकीय धुरिणांनी आणि पक्षांनी अशा प्रकारच्या घटना होऊ देऊ नयेत, तरच मशाल खानच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल.

Web Title: Malala Yousafzai hits out at radicals in Pakistan; says Pakistan is responsible for bad name of country