मालदीवचा मुद्दा राष्ट्रसंघामोर येणार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

दोन दिवसांपूर्वी मालदीवचे अध्यक्ष अब्दुल्ला यामिन यांनी देशात आणीबाणी लागू केली असून, मुख्य न्यायाधीश सईद यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्रसंघाने मालदीवमधील आणीबाणी उठवण्याची मागणी अध्यक्ष यामिन यांना केली आहे. तसेच राजकीय पेचावर चर्चा करण्याची तयारीही दर्शविली आहे

माले - मालदीवच्या वरिष्ठ न्यायाधीशांना अटक करण्यापूर्वी जिवे मारण्याची धमकी दिली होती, असे आज त्यांच्या वकिलाने सांगितले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मालदीवचा मुद्दा मांडण्यात येणार असून, या पार्श्‍वभूमीवर वकिल हिसान हुसेन यांनी माहिती दिली. विरोधी पक्षाच्या नेत्यांना सोडून देण्याचा न्यायालयीन आदेश मागे घेतला नाही, तर मुख्य न्यायाधीश अब्दुला सईद यांचे तुकडे करण्यात येतील, अशी धमकी देशातील बड्या राजकीय नेत्याच्या नातेवाइकांनी दिल्याचे हुसेन म्हणाले.

दोन दिवसांपूर्वी मालदीवचे अध्यक्ष अब्दुल्ला यामिन यांनी देशात आणीबाणी लागू केली असून, मुख्य न्यायाधीश सईद यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्रसंघाने मालदीवमधील आणीबाणी उठवण्याची मागणी अध्यक्ष यामिन यांना केली आहे. तसेच राजकीय पेचावर चर्चा करण्याची तयारीही दर्शविली आहे.

मालदीवमध्ये अलीकडच्या काळात राजकीय विरोधकांवर, पत्रकारांवर, मानवी हक्क कार्यकर्त्यांवर सातत्याने हल्ले होत आहेत. या घटना लोकशाहीविरोधी असल्याचे म्हणत राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार संघटनेचे प्रमुख झैद रहाद अल हुसेन यांनी काल केले होते.

Web Title: maldives united nations

टॅग्स