२२ वर्षीय तरुणाने माजी पंतप्रधानांवर भिरकावला बूट 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 मार्च 2020

नेपाळमधील सत्तारूढ नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान पुष्पा कमल दहल "प्रचंड" रविवारी एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी काठमांडू येथे आले असता एका २२ वर्षीय तरुणाने त्यांच्यावर बूट भिरकावला.

काठमांडू : नेपाळमधील सत्तारूढ नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान पुष्पा कमल दहल "प्रचंड" रविवारी एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी काठमांडू येथे आले असता एका २२ वर्षीय तरुणाने त्यांच्यावर बूट भिरकावला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

तरुणाने बूट का भिरकावला यामागचे कारण अद्याप समोर आले नसून बूट भिरकावणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. भिरकावलेला बूट प्रचंड यांच्यापर्यंत पोहोचला नसल्याचे त्यांच्या पक्षातील नेत्यांनी सांगितले असून बूट भिरकावणारा तरुण जुमला जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

CoronaVirus : राज्यातील निरीक्षणाखालील 121 जणांना संसर्ग नाही

कम्युनिस्ट नेते भारत मोहन अधिकारी यांच्या पहिल्या पुण्यतिथी कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना संबोधित केल्यानंतर ते आपल्या जागेवर परत येत असताना या तरुणाने त्यांच्यावर बूट भिरकावला. बूट भिरकावणारा तरुण माजी नक्षलवाद्याचा मुलगा असून सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे.

Image result for pushpa kamal dahal nepal ex Pm


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Man arrested in Kathmandu for hurling shoe at former Nepal PM Pushpa Kamal dahal

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: