'ती' इंग्रजीत बोलली; मग कापलं डोक अन् खाल्ला मेंदू...

वृत्तसंस्था
शनिवार, 7 डिसेंबर 2019

दारू पिऊन तो नषेत पडला होता. एक महिला त्याच्याजवळ आली आणि त्याच्याशी इंग्रजीमध्ये संवाद साधला. पण, त्याला इंग्रजी न कळाल्यामुळे व भूक लागल्यामुळे त्याने महिलेचा खून केला आणि तिचा मेंदू काढून खाल्ला. फिलीपिन्समध्ये ही घटना घडली असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

न्यूयॉर्क: दारू पिऊन तो नषेत पडला होता. एक महिला त्याच्याजवळ आली आणि त्याच्याशी इंग्रजीमध्ये संवाद साधला. पण, त्याला इंग्रजी न कळाल्यामुळे व भूक लागल्यामुळे त्याने महिलेचा खून केला आणि तिचा मेंदू काढून खाल्ला. फिलीपिन्समध्ये ही घटना घडली असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

लॉयड बॅगटाँग (वय 21) असे अटक केलेल्या विकृताचे नाव आहे. पोलिसांनी त्याला गुरुवारी (ता. 5) अटक केली. बॅगटाँगने तपासादरम्यान पोलिसांना सांगितले की, 'नशेत रस्त्याच्या बाजूला पडलो होतो. शिवाय, प्रचंड भूकही लागली होती. यावेळी एक अज्ञात महिला आली व तिने इंग्रजीमध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण, मला इंग्रजी येत नसल्यामुळे तिचा राग आला. तिचा खून केला व डोकं धडापासून वेगळे केले आणि मेंदू काढून खाल्ला.'

Police say the woman had spoke to Bagtong in English, which likely irritated him, before he killed and dismembered her in the village of Talisayan, on Mindanao island (file image) पोलिस अधिकारी मारिबेथ रामोगा यांनी सांगितले की, 'तरूणाच्या घरापासून काही अंतरावर महिलेचे अवयव सापडले आहेत. महिलेचा मृतदेह सापडला तेव्हा तिच्या अंगावर केवळ जीन्स होती. तिचे हात बांधलेले होते. बॅगटाँगला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.'

प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, घटना घडण्यापूर्वी महिला चालत जाताना पाहिली होती. बॅगटाँग हा बेरोजगार आहे. नशेत असताना त्याने महिलेचा खून केला. नंतर मोठ्या चाकूने तिचं डोकं धडापासून वेगळं केले आणि एका कापडात गुंडाळून घरी घेऊन गेला. भात तयार केला आणि महिलेचा मेंदू त्यावर ठेवून खाल्ला. नंतर घराजवळील एका खड्ड्यात महिलेचे डोके फेकून दिले.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: man decapitates a woman and eats her brain at philippines