कराल "नायगरा'ने गिळले विक्रमवीरास...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 जून 2017

53 वर्षीय जोन्स यांनी ऑक्‍टोबर 2003 मध्ये याच धबधब्यावरुन कोणत्याही संरक्षणाशिवाय उडी मारली होती. अशा प्रयत्नात वाचलेला पहिलाच नागरिक ठरण्याचा विक्रम त्यांच्या नावावर होता

न्यूयॉर्क - अमेरिका व कॅनडा या दोन देशांच्या सीमारेषेवर असलेल्या नायगरा या जगप्रसिद्ध धबधब्यावरुन एका हवेच्या फुग्यामधून उडी मारलेल्या किर्क आर जोन्स यांना मृत्यु आला असल्याचे निष्पन्न झाले आहे.

53 वर्षीय जोन्स यांनी ऑक्‍टोबर 2003 मध्ये याच धबधब्यावरुन कोणत्याही संरक्षणाशिवाय उडी मारली होती. अशा प्रयत्नात वाचलेला पहिलाच नागरिक ठरण्याचा विक्रम त्यांच्या नावावर होता. जोन्स यांच्यानंतर नायगरा धबधब्यावरुन कोणत्याही संरक्षणाशिवाय उडी मारण्यात तिघांना यश आले आहे.

यावेळी जोन्स यांनी उडी मारण्याकरिता एका 10 फुटी (3 मीटर) फुग्याचा वापर केला होता. मात्र त्यांना या प्रयत्नात मृत्यु आला. अमेरिकेच्या तटरक्षक दलास त्यांचा मृतदेह सापडला आहे.

Web Title: Man dies in Niagara Falls after surviving 2003 plunge