पाण्याखाली प्रपोज करताना तरुणाचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

पाण्याखाली जाऊन लग्नाची मागणी घालत असताना पुन्हा वर येऊ न शकल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

डोडोमा : प्रियकर आपल्या प्रेयसीला पाण्याखाली जाऊन लग्नाची मागणी घालत असताना पुन्हा वर येऊ न शकल्याने तरूणाचा मृत्यू झाला आहे. टानजानियामध्ये सुट्टी घालवण्यासाठी गेलेल्या प्रेमीयुगलासोबत ही घटना घडली असून स्टीव्हन वेबर असे मृत तरुणाचे नाव आहे. 

स्टीव्हन हा आपली प्रेयसी केनेशा अँटोनी हिच्यासह पेंबा आयलंड येथे सुट्टीसाठी गेला होता. या वेळी ते दोघेही एका जहाजावर आपली सुट्टी घालवत होते. गुरुवारी वेबर याने पाण्याखाली जाऊन त्यांच्या बेडरूमच्या खिडकीत येऊन एका चिठ्ठीद्वारे केनेशा हिला लग्नाची मागणी घातली. यात त्याने लिहिले होते, की "मला तुझ्यातलं काय आवडतं हे सांगण्यासाठी मी जास्त वेळ माझा श्‍वास रोखून धरू शकत नाही आणि मी दररोज तुला आधीपेक्षा जास्त प्रेम करतो, तु माझी पत्नी होशील का?' मात्र, या सर्वानंतर पुन्हा पाण्यावर येणे वेबरला जमले नसल्याने त्याचा मृत्यू झाला.

ही सर्व माहिती केनेशा हिने आपल्या फेसबुकवर एका पोस्टद्वारे लिहिली आहे. ज्यात तिने वेबरचा मागणी घालतानाचा व्हिडीओदेखील पोस्ट केला आहे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: a man drowns after proposing to his girlfriend underwater

टॅग्स