गुगल मॅप्सचा वापर केला अन्...

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

जगभरात गुगलचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्याचाच एक भाग असलेल्या गुगल मॅप्सचाही वापर अनेकांसाठी परिचयाचा आहेच.

वॉशिंग्टन : जगभरात गुगलचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्याचाच एक भाग असलेल्या गुगल मॅप्सचाही वापर अनेकांसाठी परिचयाचा आहेच. अनोळखी ठिकाणी जायचे म्हटले की अनेकजण हमखास गुगल मॅप्सचा वापर करतात. मात्र, हा वापर करणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. इच्छित स्थळी जाण्यासाठी एका व्यक्तीने गुगल मॅप्सचा वापर केला मात्र, तो थेट गोठलेल्या मिसीसिपी नदीत जाऊन पडला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गुगल मॅप्सच्या गो-टू-फिचर्स हे स्मार्टफोनमध्ये असून, त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. सर्वाधिक डाऊनलोड झालेल्या अॅप्सपैकी हे एक अॅप्स आहे. याच गुगल मॅप्सच्या आधारे रस्ता शोधणाऱ्या एका व्यक्तीला त्याचा चांगला फटका बसला. तो थेट अमेरिकेतील मिसीसिपी नदीत पडला. ही घटना स्टोन अर्च पुलाजवळ घडली. संबंधित व्यक्तीने गुगल मॅप्सच्या माध्यमातून चुकीची दिशा दाखवल्याचा आरोप केला आहे. ती व्यक्ती गोठलेल्या नदीवरून जात होती. त्यावेळी बर्फाच्या नदीत पडली. ही घटना समजल्यानंतर बचाव पथकाने शर्थीचे प्रयत्न करत संबंधित व्यक्तीला वाचवले.

Image result for google maps

अग्निशमन विभागाने सांगितले, की एक व्यक्ती गोठलेल्या नदीवरून जात होती. त्यानंतर संबंधित व्यक्ती नदीत पडली. त्यानंतर तिने गुगल मॅप्सवर आरोप केला. 

Image result for google maps

दरम्यान, या प्रकाराबाबत समजल्यानंतर गुगलकडूनही स्पष्टीकरण देण्यात आले आहे. 'पूल पार करून दुसरीकडे जा पण नदीवरून जाऊ नका', असे सांगण्यात आले होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Man falls into frozen Mississippi river blames Google Maps