विमानातून प्रवाशाला खेचून बाहेर काढले 

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 एप्रिल 2017

"युनायटेड'वर बहिष्कार टाका! 
व्हिडिओ पाहून संतापलेल्या नागरिकांनी फेसबुक, ट्विटर आदी सोशल मीडिया साइटवर "युनायटेड एअरलाइन्स'वर जोरदार टीका केली. मात्र त्यानंतरही संबंधित विमान कंपनीकडून माफी मागण्यात आली नाही. जगभर टीका झाल्यानंतर "युनायटेड एअरलाइन्स'च्या समभागालाही मोठा फटका सहन करावा लागला. तसेच अनेक नागरिकांनी "युनायटेड एअरलाइन्स'वर बहिष्कार टाकण्याचे प्रवाशांना आव्हान केले आहे.

शिकागो - शिकागोतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर "युनायटेड एअरलाइन्स'च्या विमानातून एका प्रवाशाला सुरक्षा अधिकारी चक्क ओढून बाहेर काढत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर "व्हायरल' झाल्यानंतर संबंधित विमान कंपनीवर जगभरातून टीका होत आहे. या प्रकरणामुळे मोठ्या प्रमाणात बदनामी झाल्यानंतर त्याचा युनायटेड एअरलाइन्स विमान कंपनीच्या समभागालाही फटका बसला आहे. 

शिकागोतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर लुईसव्हिले, केंटुकी येथे जाणाऱ्या विमानात बसलेल्या आशियायी वंशाच्या एका डॉक्‍टरला सुरक्षा अधिकाऱ्यांनी चक्क ओढून बाहेर काढले. "मला घरी जाऊ द्या,' ही प्रवाशाची विनंती ना विमानातील कर्मचाऱ्यांनी ऐकली ना सुरक्षा अधिकाऱ्यांनी. प्रवाशाची इच्छा नसतानाही त्याला आपल्या जागेवरून फरफटत ओढून काढत विमानाच्या बाहेर आणण्यात आले. या झटापटीत प्रवासी जखमी झाला, मात्र विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्याची पर्वा केली नाही. या वेळी विमानातील प्रवाशांनीही संताप व्यक्त केला, मात्र त्यास विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दाद दिली नाही. 

संबंधित विमानाची अतिरिक्त तिकिटे विकण्यात आली होती. त्यामुळे काही प्रवाशांनी खाली उतरावे, अशी विनंती विमानातील कर्मचाऱ्यांनी केली. मात्र त्यास कोणीच तयार नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी संगणकाच्या मदतीने काही प्रवाशांची निवड करून त्यांना विमानातून खाली उतरण्यास भाग पाडले. 

स्थानिक वेळेनुसार रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. या घटनेचे विमानातील काही सहप्रवाशांनी चित्रण केले होते. या घटनेचा व्हिडिओ थोड्याच कालावधीत सोशल मीडिया साइटवर जगभर "व्हायरल' झाला. 

"युनायटेड'वर बहिष्कार टाका! 
व्हिडिओ पाहून संतापलेल्या नागरिकांनी फेसबुक, ट्विटर आदी सोशल मीडिया साइटवर "युनायटेड एअरलाइन्स'वर जोरदार टीका केली. मात्र त्यानंतरही संबंधित विमान कंपनीकडून माफी मागण्यात आली नाही. जगभर टीका झाल्यानंतर "युनायटेड एअरलाइन्स'च्या समभागालाही मोठा फटका सहन करावा लागला. तसेच अनेक नागरिकांनी "युनायटेड एअरलाइन्स'वर बहिष्कार टाकण्याचे प्रवाशांना आव्हान केले आहे.

Web Title: Man filmed being dragged off United flight causes outrage in China