काबुलमध्ये वृत्तवाहिनीच्या केंद्रावर बॉम्ब हल्ला

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

काबुल- अफगाणिस्तानच्या राजधानीत एका खाजगी टीव्ही केंद्रावर मंगळवारी स्फोट झाला. काही बंदुकधाऱ्यानी या इमारतीवर हा हल्ला घडवून आणला असल्याचे सुत्रांनी सांगितले. 

केंद्राच्या ट्विटर अकाऊंटवरील ट्विटद्वारे इमारतीच्या आत सुरू असलेल्या हालचालींची माहिती मिळाली. जे कर्मचारी दूरध्वनीपर्यंत पोचू शकले त्यांनी दोन ते पाचजण ठार झाल्याचे सांगितले. मृतांची संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही, असे काबुलचे पोलिस बसीर मुजाहीद यांनी सांगितले.

ते म्हणाले, केंद्राच्या मुख्य द्वारापासून हल्ल्याला सुरूवात झाली. मुख्य द्वाराजवळ स्फोट करून हल्लेखोर आत घुसले. हल्लेखोरांपैकी एक लगेच ठार झाला. परंतु इतर हल्लेखोर हातगोळ्यांसह आत घुसले. 
हल्ला संपल्यानंतर शमशाद टिव्हीच्या एका पाश्तो भाषिक प्रसारकाने नेहमीचे प्रसारण बंद करून केवळ एक स्थिर चित्रं प्रसारीत केले. हल्लेखोरांची अद्याप ओळख पटलेली नाही. मात्र तालिबानी संघटनेकडून या हल्ल्यात आपला हात नसल्याचे तात्काळ कळविण्यात आले आहे. 
अफगाणिस्तान येथे यापूर्वीही पत्रकार आणि माध्यम कर्मचाऱ्यावर हल्ले झाले आहेत. गेल्या वर्षी अफगाणिस्तानच्या सगळ्यात मोठ्या खाजगी 'टोलो' या टेलिव्हिजन केंद्रावर हल्ला झाला होता. ज्यात तालिबानने वापरलेल्या आत्मघाती बॉम्बमुळे अनेक लोक मृत्युमुखी पडले होते.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com