न्यूयॉर्कमध्ये दहशतवादी हल्ला; 8 ठार, अनेक जखमी

वृत्तसंस्था
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

माथेफिरूचे दहशतवादी कृत्य

हा हल्ला करणाऱ्या 29 वर्षीय चालकाने ट्रकमधून उडी मारल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. त्यानंतर त्याच्या हातात असलेली बंदूक बनावट असल्याचे उघड झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

न्यूयॉर्क : वर्ल्ड ट्रेड सेंटर स्मारकाजवळ एका भाडोत्री पिकअप ट्रकमधून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने रहदारीच्या सायकल मार्गावर बेभानपणे गाडी चालवत लोकांना चिरडले. यामध्ये किमान आठजणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले. "हे भ्याड दहशतवादी कृत्य आहे" असे न्यूयॉर्कच्या महापौरांनी म्हटले आहे. 

हा हल्ला करणाऱ्या 29 वर्षीय चालकाने ट्रकमधून उडी मारल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. त्यानंतर त्याच्या हातात असलेली बंदूक बनावट असल्याचे उघड झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले, मात्र त्याची स्थिती काय आहे याबद्दल अधिक माहिती अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही. 

इसिसला अमेरिकेत प्रवेश नाही 
पुन्हा एकदा विकृत मानसिकतेतून हल्ला झाला असून, अमेरिकेत इसिसला आपण प्रवेश देणार नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. एक्स्ट्रिम व्हेटिंग प्रोग्रॅम आणखी कठोर करून सुरक्षा वाढविण्याचे आदेश गृहखात्याला मी दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले.  

अमेरिकेचं मुख्य आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र असलेल्या मॅनहॅटन शहराच्या भागात कडक सुरक्षा व्यवस्था आहे. मॅनहॅटन शहराची लोकसंख्या 16 लाखांहून अधिक आहे. अमेरिकेच्या अनेक रेडिओ, टीव्ही आणि टेलिकॉम कंपन्या याच शहरात आहेत.
 

Web Title: marathi news america 8 killed by New York motorist