...अन् ती कार इमारतीच्या दुसऱ्या मजल्यात घुसली

वृत्तसंस्था
सोमवार, 15 जानेवारी 2018

अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील एक कार दुभाजकाला धडकून हवेत उडाली. एवढेच नव्हे तर ही कार हवेत उडून रस्त्याला लागून असलेल्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर घुसली. स्थानिक अग्निशमन विभागाने या अपघाताचे छायाचित्रे शेअर केलेत. ही छायाचित्रे बघितल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडेल की ही कार रस्त्यावर चालत होती की हवेत! पांढऱ्या रंगाची असलेली ही सिडन कार रस्त्याच्या कडेला असलेल्या दंतवैद्यक कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर घुसली आणि हवेत लटकत होती. 

कॅलिफोर्नियाच्या ऑरेंज काउंटी फायर अथॉरेटीचे प्रवक्ता कॅप्टन स्टीफेन हॉर्रनर यांनी सांगितले, 'आमच्या अधिकाऱ्यांना सकाळी 5:30 वाजता सेंटा एना परिसरात एक कार दुर्घटनाग्रस्त झाल्याचे कळले. ही कार खुप वेगाने धावत होती. त्यामुळे ती रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या सिमेंटच्या दुभाजकावर जाऊन आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की कार हवेत उसळली आणि रस्त्यालगतच्या इमारतीच्या भिंतीत शिरली.' 

हवेत 15 मीटरच्या आसपास ही कार उसळल्याची माहिती आहे. या अपघातानंतर कारला आग लागली. जी लगेच विझवण्यात आली. कारमध्ये दोन लोक होते. पैकी एक व्यक्ती कारच्या बाहेर निघण्यात यशस्वी झाली. दुसरी व्यक्ती मात्र कारमध्ये एक तास अडकून होती. ज्याला सुरक्षा एजंसीच्या लोकांनी बाहेर काढले. या दोन्ही व्यक्तींना किरकोळ दुखापत झालेली आहे. त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आले. 
 
Web Title: marathi news america car accident and car jumped into the second floor of a building