हा 14 वर्षीय विद्यार्थी चालवणार पहिली लँम्बोरगिनी ट्रोफेओ इवो रेस कार

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 मार्च 2018

स्टिवन अघाखानी हा नुकताच पहिली लँम्बोरगिनी ह्युरॅकॅन सुपर ट्रोफेओ इवो रेस कारचा मानकरी ठरला आहे.

कॅनिफोर्निया - येथील ला कॅनडा हाय स्कुलचा 14 वर्षीय विद्यार्थी स्टिवन अघाखानी हा नुकताच पहिली लँम्बोरगिनी ह्युरॅकॅन सुपर ट्रोफेओ इवो रेस कारचा मानकरी ठरला आहे. स्टिवनच्या वडिलांनी त्याला लँम्बोरगिनी एडीशनची पहिली ट्रोफेओ इवो रेस कार भेट दिली आहे. एका यु. एस. वृत्तानुसार, स्टिवनने रेसिंग कार चालविल्या आहेत. त्याने वयाच्या 7 व्या वर्षापासून रेसिंग गो कार्ट या रेसिंग प्रकारात भाग घेतला आहे. तसेच नासा प्रो सिरीज् साउर्थन कॅनिफोर्निया रिजनल चॅम्पिअनशिपमध्येही सहभाग घेतला आहे आणि सध्या त्याचे प्रशिक्षण रोलेक्स 24 रेस साठी डेटोना येथे सुरु आहे. 
Steven Aghakhani नवी ह्युरॅकॅन सुपर ट्रोफेओ इवोची रचना लँबॉर्गिनी स्क्वाड्रा कॉर्से कडून करण्यात आली आहे. ही रचना रेसिंग चॅसीस बिल्डर दल्लारा इंजिनियरिंगच्या मदतीने करण्यात आली आहे. 'इवो' ही ह्युरॅकॅनच्या 5.2-लिटर व्ही-10 च्या रेसिंग-ट्यून व्हर्जनचे 620-हॉर्सपॉवर आणि 413 पाउंड-फिट चा टॉर्क निर्माण करणाऱ्या इंजिनवर कार्यान्वित आहे. 
Steven Aghakhani


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news america Steven Aghakhani Lamborghini Huracan Super Trofeo Evo race car