बातम्या देताना अँकरच्या डोक्यावर येऊन बसला पक्षी

वृत्तसंस्था
सोमवार, 5 मार्च 2018

कॅलिफोर्निया - येथील सेन डियागोच्या केएफएमबी टीव्हीमध्ये अजब घटना घडली. अँकरच्या डोक्यावर अचानक एक पक्षी येऊन बसला आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

केएफएमबी टीव्हीवर सकाळचा शो सुरु होता. हा शो निकेल मेडिया आणि एरिक कानहर्ट हे दोन अँकर सादर करत असतानात एक परदेशी पक्षी निकेल मेडिया यांच्या डोक्यावर येऊन बसला. ही घटना पाहून प्रेक्षकांसह निकेलसोबत अँकरिंग करणाऱ्या एरिक यांनाही हसू आवरत नव्हते. तर निकेल यांनी अतिशय शांतपणे या घटनेचा सामना केला. न डगमगता त्या शांत बसून राहिल्या. लाईव्ह कार्यक्रमावेळी झालेल्या या घटनेचा व्हिडीओ तत्काळ व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओतील निकेल यांच्या डोक्यावर बसलेला पक्षी स्कारलेट बर्ड आहे. हा पक्षी कॅलिफोर्नियाच्या सॅन डियागो पक्षी अभयारण्याचा निवासी आहे.

Web Title: marathi news bird news anchor san diego california