मालदीवचा बहुराष्ट्रीय नौदल सरावास नकार 

वृत्तसंस्था
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

भारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिरल सुनील लांबा यांनी मंगळवारी 6 मार्चपासून सुरू होणाऱ्या या आठ दिवसांच्या नौदल सराव कार्यक्रमाची घोषणा केल्यानंतर मालदीवच्या दिल्लीतील दूतावासातून या कार्यक्रमाला अनुपस्थित राहण्याची माहिती मिळाली.

मालदीव : पुढील महिन्यात भारताने आयोजित केलेल्या बहुराष्ट्रीय नौदल सराव कार्यक्रमाला येण्याचे आमंत्रण मालदीवने नाकारले असून, मालदीवमधील आणीबाणीच्या परिस्थितीत त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याचे स्पष्टीकरण मंगळवारी दिले.    

या सरावापासून दूर राहण्याचे कारण देताना मालदीवच्या नौदल अधिकाऱ्यांनी सावधपणे त्यांचे म्हणणे मांडले की, 'या नौदल सरावात मालदीवच्या नौदलाचे अधिकारी हे केवळ प्रक्षेक म्हणून असतील, त्यामुळे त्यांची अनुपस्थिती ही फार लक्षणीय नसेल.' भारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिरल सुनील लांबा यांनी मंगळवारी 6 मार्चपासून सुरू होणाऱ्या या आठ दिवसांच्या नौदल सराव कार्यक्रमाची घोषणा केल्यानंतर मालदीवच्या दिल्लीतील दूतावासातून या कार्यक्रमाला अनुपस्थित राहण्याची माहिती मिळाली.

 ahemad mohammad maldives ambessedor

मालदीवचे भारतातील राजदूत अहमद मोहम्मद यांनी सांगितले की, 'मालदीवमधील सध्याची परिस्थिती बघता, तिथेच सुरक्षितता वाढवण्याची गरज आहे, या काळात देश सोडून नौदल सरावास येणे योग्य ठरणार नाही.' त्याचबरोबर त्यांनी सांगितले की, 'दोन्ही देशांमध्ये उत्कृष्ट संरक्षण आणि लष्करी सहकार्याचा दीर्घकाळाचा इतिहास आहे, ही एक परंपरा आहे. आम्हाला खात्री आहे की हे संबंध कायम राहतील.'

यापूर्वी नौदल सराव कार्यक्रम 1995 साली पहिल्यांदा पाच नौदलांबरोबर, क्षेत्रीय सहकार्य वाढविण्याच्या उद्देशाने केला होता. यात ऑस्ट्रेलिया, मलेशिया, मॉरीशस, म्यानमार, न्यूझिलंड आणि ओमान या देशांच्या नौदलाचा सहभाग होता. 

Web Title: Marathi news global news Maldives Declined India's Invite To Mega Naval Exercise