मी वर्णद्वेषी नाही : डोनाल्ड ट्रम्प 

पीटीआय
सोमवार, 15 जानेवारी 2018

वॉशिंग्टन : हैती आणि आफ्रिका देशातील प्रवाशांसंबधी वादग्रस्त मत व्यक्त केल्याने टीकेला सामोरे जाणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सारवासारव करत आपण वर्णद्वेषी नसल्याचे स्पष्ट केले. 

अमेरिकेत गेल्या आठवड्यात द्विपक्षीय गटाच्या सदस्यांसमवेत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ट्रम्प यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आहे.

यात ट्रम्प म्हणाले, की बैठकीत उपस्थित काही कनिष्ट दर्जाचे देश त्यांच्या देशातील नागरिकांना अमेरिकेत येण्यासाठी दबाव टाकत आहेत. या वक्तव्यानंतर ट्रम्प यांच्यावर सातत्याने वर्णद्वेषी असल्याची टीका केली जात आहे; मात्र या आरोपांचा ट्रम्प यांनी इन्कार केला आहे.

माझ्यावर विनाकारण आरोप केले जात असल्याचे ट्रम्प म्हणाले. मी वर्णद्वेषी नसल्याचे सांगत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. काल पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की आतापर्यंत जेवढ्या लोकांच्या मुलाखती आपण घेतल्या असतील, त्यात मी सर्वांत कमी वर्णद्वेषी आहे. त्या दोषी लोकांच्या यादीत माझे नाव टाकू नका, असे आवाहन त्यांनी पत्रकारांना केले; परंतु ट्रम्प यांच्या विरोधकांनी ते वर्णद्वेषी असल्याचा आरोप केला.

द्विपक्षीय गटाच्या बैठकीत तो शब्द वापरला नसल्याचे ट्रम्प यांनी सांगितले; मात्र बैठकीतील भाषा कठोर होती, हे त्यांनी मान्य केले. दरम्यान, त्या बैठकीला हजर असलेल्या एका रिपब्लिकन सिनेटरने ट्रम्प यांनी वादग्रस्त वक्तव्य केले नसल्याचा दावा केला आहे.

या वादग्रस्त शब्दाच्या निषेधार्थ डेमोक्रॅटिकच्या चार खासदारांनी बहिष्कार घातला होता. दुसरीकडे आफ्रिकन युनियनने ट्रम्प यांच्या माफीची मागणी केली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Global News US Donald Trump