एच- 1 बी व्हिसाची प्रक्रिया होणार अधिक खडतर 

representational image
representational image

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाच्या नव्या धोरणामुळे एच-1 बी व्हिसासाठी अर्ज करण्याची प्रकिया अवघड होणार आहे. भारतीय आयटी कंपन्या आणि या क्षेत्रात काम करणारे भारतीयांना या नव्या धोरणाचा फटका बसू शकतो. 

एच-2 बी व्हिसाच्या माध्यमातून कंपन्यांना कुशल परदेशी कर्मचाऱ्यांना अमेरिकेमध्ये संधी देणे शक्‍य होते. कुशल अमेरिकी कर्मचाऱ्यांची उणीव भरून काढण्यासाठी सर्वसाधारणत: आयटी कंपन्या हा मार्ग अवलंबतात. याचा सर्वाधिक फायदा भारतीय आयटी कंपन्यांना होत असतो. अमेरिकेतील बॅंकिंग, पर्यटन आणि व्यावसायिक सेवा देणाऱ्या बहुतांश कंपन्या भारतीय कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहेत. 

ट्रम्प प्रशासनाने एच-1 बी व्हिसाच्या धोरणातील बदल काल (गुरुवार) जाहीर केले. यानुसार, आता एखाद्या कर्मचाऱ्याला एच- 1 बी व्हिसाद्वारे अमेरिकेत काम मिळविण्यासाठी त्या कंपनीला अधिक कडक निकषांना सामोरे जावे लागणार आहे. तसेच, आता कामाच्या नेमक्‍या दिवसांपुरताच एच-1 बी व्हिसा देण्याचा अधिकारही या धोरणाद्वारे संबंधित विभागाला देण्यात आला आहे. 

या निर्णयामुळे तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी एच-1 बी व्हिसा देण्याचा अमेरिकी प्रशासनाचा मार्ग मोकळा होईल. यापूर्वी एका वेळी तीन वर्षांसाठी एच-1 बी व्हिसा दिला जात असे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com