हिलरी यांच्या भारतातील विधानावर टीका

पीटीआय
मंगळवार, 13 मार्च 2018

वॉशिंग्टन : अमेरिकेतील अध्यक्षपदासाठी 2016मध्ये झालेल्या निवडणुकीत ज्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा दिला त्यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्‍लिंटन यांच्यावर टीका होत आहे. 

भारतात मुंबईमध्ये एका परिषदेत बोलताना हिलरी क्‍लिंटन यांनी हे वक्तव्य केले होते.

''काही जणांनी ट्रम्प यांना पाठिंबा दिला, त्याचे कारण म्हणजे कृष्णवर्णीयांना अधिकार मिळणे, महिलांना नोकऱ्या मिळणे किंवा भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांना त्यांच्यापेक्षा जास्त यश मिळणे या गोष्टींना त्यांचा विरोध आहे. या भावनेतूनच ट्रम्प यांना समर्थन मिळाले,'' असे वक्तव्य क्‍लिंटन यांनी केले होते.

ट्रम्प यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीच्या पहिल्या यशस्वी वर्षाच्या पार्श्‍वभूमीवर क्‍लिंटन यांनी केलेल्या विधानातून त्यांचा फुटीरतावादी दृष्टिकोन व त्रुटी लपविण्यासाठीचा प्रयत्न दिसून येतो, अशी टीका पुनीत अहलुवालिया यांनी केली.

2016 मधील ट्रम्प आशिया प्रशांत सल्ला समितीचे ते सदस्य होते. ट्रम्प यांचे पुत्र डोनाल्ड जे ट्रम्प ज्युनिअर हे नुकतेच भारतभेटीवर गेले होते. त्यांनी तेथे भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांचे कौतुक केले होते.

Web Title: marathi news hillary clinton donald trump us presidential elections