बिल न भरल्याने पाच महिने बाळ ओलिस

वृत्तसंस्था
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

गॅबॉन (आफ्रिका) - एका दवाखान्याच्या प्रशासनाने कित्येक महिने एका नवजात बाळाला ओलिस ठेवून घेतले होते. बाळाच्या आईवडिलांनी दवाखान्याचे थकित बिल भरले नसल्याने दवाखान्याने असे केले होते. अखेर जन्माच्या पाच महिन्यांनंतर बिलाचे पैसे भरल्यावर दवाखान्याने या बाळाची सुटका केली. घडलेल्या या प्रकाराने संपूर्ण देश हादरून गेला आहे. 

गॅबॉन मीडिया टाईम्स या फ्रेंच वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, आईची प्रसूती वेळेआधीच झाल्याने बाळाला 35 दिवस काचेच्या पेटीत ठेवण्यात आले होते. दवाखान्याने त्याचे एवढे जास्त बिल पाठवले होते जे बाळाच्या परिवाराला भरणे शक्य नव्हते. त्यानंतर या बाळाला दवाखान्यातच ठेवून घेण्यात आले.

या बाळाची सुटका व्हावी यासाठी अनेकांनी बाळाच्या आईला पाठिंबा दिला. या परिवारासाठी एक लोकवर्गणी मोहिम राबवण्यात आली, ज्यातून दोन कोटी CFA (गॅबॉनचे चलन) म्हणजेच 2.33 लाख रुपये जमा झाले आणि दवाखान्याचे बिल भरले गेले. त्यानंतर बाळाची सुटका झाली.

याबद्दल बोलताना, "पहिल्या पाच महिन्यात मला माझ्या बाळापासून लांब ठेवल्यानं माझं दूध आटून गेलं आहे," असे बाळाची आई सोनिया ओकमे यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले. या पाच महिन्याच्या काळात बाळाला कोणत्याही प्रकारच्या लसी देखील दिल्या नसल्याची तक्रार बाळाच्या ओकमे यांनी केली आहे

संबंधित दवाखान्याच्या संचालकांना सोमवारी बाळाचे अपहरण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. मात्र, त्यांच्यावर लावलेले गुन्हे दुसऱ्या दिवशी मागे घेण्यात आल्याची माहिती एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे.

Web Title: marathi news Hospital baby mother bills