हल्ला करण्यासाठी भारत दहशतवादी तयार करत आहे : पाकिस्तानचा दावा 

वृत्तसंस्था
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

इस्लामाबाद : 'चीन आणि पाकिस्तानच्या महत्त्वाकांक्षी 'सीपेक' या प्रकल्पातील कामांवर हल्ले करून हा प्रकल्प बंद पाडण्याचा भारताचा डाव आहे', असा दावा पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने केला आहे. गिलगिट-बाल्टिस्तानमधील सरकारला पत्र लिहून गृह मंत्रालयाने सतर्क राहण्याचे आदेशही दिले आहेत. 'या प्रकारचे हल्ले करण्यासाठी भारताने काही तरुणांना प्रशिक्षणही देण्यास सुरवात केली आहे' असा दावाही करण्यात आला आहे. 

चीन आणि पाकिस्तानने त्यांच्या आर्थिक व्यवहारांतील सुलभतेसाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प आखला आहे. या प्रकल्पाच्या योजनेमधील काराकोरम महामार्गावरील पुलांसह इतर काही मोक्‍याच्या ठिकाणांवर दहशतवादी हल्ला होऊ शकतो, असा इशारा पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने संबंधित विभागांना दिला आहे. यासंदर्भात पाकिस्तानच्या 'द डॉन' या वृत्तपत्राने बातमी प्रसिद्ध केली आहे. 

'भारताने 400 मुस्लिम तरुणांना अफगाणिस्तानमध्ये प्रशिक्षणासाठी पाठविले आहे. त्या तरुणांना दहशतवादी हल्ल्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे' असा दावा पाकिस्तानच्या गृह मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने केला. यानंतर 'सीपेक'शी संदर्भातील सर्व आस्थापनांच्या सुरक्षेत वाढ केल्याचे गिलगिट-बाल्टिस्थानमधील प्रशासनाने सांगितले.

यामध्ये काराकोरम महामार्गावरील जवळपास 24 पुलांचाही समावेश आहे. गृह मंत्रालयाच्या या इशाऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर स्थानिक पोलिसांनी गिलगिट-बाल्टिस्थानमधील परदेशी नागरिकांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवण्यास सुरवात केली आहे.

Web Title: marathi news India Pakistan CPEC Gilgit-Baltistan