हाफिज सईदकडून पाकच्या मंत्र्यांना अब्रू नुकसानीची नोटीस

वृत्तसंस्था
शनिवार, 6 जानेवारी 2018

हाफिज सईदशी संबंधित मालमत्ता आणि त्याने स्थापन केलेल्या धर्मदाय संस्था ताब्यात घेण्याचा पाकिस्तान सरकारचा विचार असल्याचे वृत्त देण्यात आले होते.

लाहोर : जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदने पाकिस्तानच्या मंत्र्यांना 10 कोटींची अब्रू नुकसानीची कायदेशीर नोटीस बजावली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला दिली जाणारी लष्करी मदत रोखल्यानंतर हाफिजकडून ही नोटीस बजावण्यात आली आहे.  

हाफिज सईदशी संबंधित मालमत्ता आणि त्याने स्थापन केलेल्या धर्मदाय संस्था ताब्यात घेण्याचा पाकिस्तान सरकारचा विचार असल्याचे वृत्त देण्यात आले होते. तसेच सईदशी संबंधित संस्था आणि मालमत्ता जप्त करण्याचे पाकिस्तान सरकारचे नियोजन असून, त्यासाठी एक गोपनीय आदेश काढण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. 

त्यानंतर आता हाफिज सईदकडून पाकिस्तानच्या मंत्र्यांना अब्रू नुकसानीच्या भरपाईसाठी कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news international Hafiz Saeed sends 100 million defamation notice on Pakistan minister